आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह
आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रहनाशिकचे अष्टपैलू साहित्यिक राजेंद्र उगले यांच्या आई कधीच नसते मरत या काव्यसंग्रहाचे नुकतेच नाशिक येथील शं मु औरंगाबादकर सभागृहात प्रकाशन झाले. जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक, कवी प्रकाश होळकर , प्राचार्य दिलीप धोंडगे, अष्टगंध प्रकाशनचे संजय शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यानंतर आई कधीच नसते मरत ही साहित्य कलाकृती वाचनात आली. या कलाकृतीचे सहज निरीक्षण केले असता असे लक्षात आले की, आई या व्यक्तिमत्वाला कवी राजेंद्र उगले यांनी मुखपृष्ठावर स्थान देवून जगातील समस्त आईंचा सन्मान केला आहे, आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असे मला वाटते.आई कधीच नसते मरत या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कवीने आपल्या आईचे छायाचित्र घेतले असून आईच्या भाळावर ठसठसीत कुंकु आहे, डोक्यावर पदर घेतलेला आहे, शे...
