Sunday, December 7

Tag: अराजकता…

Article

अराजकता…

अराजकता...              तीन दिवसांपूर्वी समाजमाध्यमात पसरलेला मणिपूरचा 'तो' व्हिडियो समाजमाध्यमात बघितला आणि सुन्न होऊन जागेवरच मटकन  बसले, काहीच सुचेना...! एवढे अमानवीय, विकृत कसे वागू शकतात माणसं? बरं 'माणूस' तरी कसे म्हणावे त्यांना? हिंस्त्रं श्वापदासारखी दिसत, भासत, वागत होती ती झुंड त्या विशीतल्या मुलीबरोबर. कोणत्या काळात जगतोय आपण नक्की? मोठ्ठं प्रश्नचिन्ह!! एकवीस वर्षाच्या त्या तरुण मुलीला विवस्त्र करून तिच्या अवयव, गुप्तांगाशी भयंकर पद्धतीने चाललेली छेडछाड, ती हजार पुरुषांची बेभान उन्मादित झुंड आणि त्या विकृत झुंडीत जिवाच्या आकांताने रडणारी-याचना करणारी भेदरलेली ‘ती’ असहाय एकटी. पुढे एका घोळक्यात पुन्हा एक स्त्री तशाच अगतिक अवस्थेत विवस्त्र तो घोळका दोघींची नग्न धिंड काढत त्यांच्या शरीराचे वाट्टेल तसे लचके तोडत चाललाय. जराशीही संवेदनशीलता वा माणूसपण शिल्लक असणाऱ्या सुसंस्कृत व्यक...