लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे
लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे
-------------------------------------
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर म्हणून जगप्रसिद्ध झाले. ते एक मराठी समाजसुधारक, कवीतेच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरेवर आघात करणारे कवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या समजपयोगी होते. अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारसरणी आचरण करणारे तत्ववेत्ते होते.सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाज परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त...
