समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य
समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि एकूणच आपण जेव्हा समाजअग्रणीचा बिचार करतो तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव घेणे व त्यांच्याविषयी जाणून घेणे हे क्रमप्राप्तच ठरते.भारत देश हा वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण समाजधिष्ठीत व्यवस्थेचा गुलाम झाला होता आणि त्यामध्ये असणारी जातीयतेची उतरंड यामध्ये खालच्या जातीतून वरच्या जातीत जाण्याची कोणतीच सोय नव्हती. हा देश संपूर्णत: वर्णवादाच्या, वर्णभेदाच्या चौकटीत विलीन झाला होता. या वर्णवादी उतरंडेत अस्पृश्य, स्पृश्य यांच्यात वर्तणूक, चालीरिती, अपमानित करणारी, पदोपदी छळणारी ही अमानवीय वागणूक दिल्या जात...
