Thursday, November 13

Tag: रानवेली…

Malavarchya Ranveli : माळावरच्या रानवेली
Article

Malavarchya Ranveli : माळावरच्या रानवेली

माळावरच्या रानवेली...तो प्रचंड वटवृक्ष कसा उन्मळून पडला म्हणे त्याला बीलगलेला सायलीचा वेल कुणीतरी खुडलायाप्रमाणे वरून खंबीर दिसणारी, पुरुषाच्या पाठीशी प्रत्येक संकटात साथ देणारी एक वेलरुपी स्री असते. गावाकडच्या या रानवेली अगदी चिवट होऊन आपल्या फाटक्या संसाराला सांधण्याचे काम मनापासून करत असतात. कितीही एकर शेती असू दे पण ती यांच्या नावावर कधीच नसते. यांच्या नावावर असतात त्या शेतीचे कष्ट. शहरातल्या मातीत या वेली कधीच प्रफुल्लित राहत नाही. त्यांना हवी असते गावाकडच्या शिवाराची आपली माती. यांच्या आयुष्यात निवांतपणा नसला तरी वखवख ही नसते. पहाटेपासून रुंजी घालणाऱ्या या जणू ग्रामीण ओव्याचं म्हणाव्या लागतील. आयुष्यभर कष्टच वाट्याला आलेले आणि रोजचे उन्हातले काम.फोटोजेनिक असा यांचा चेहरा कधीच नसतो.आयुष्यातील दुःखाचे काळे डाग यांच्या चेहऱ्यावर जागा मिळवतात, पण फेस क्रिम कशी असते ही यांना ठाऊक ...