यशोगाथा तिच्या संघर्षाची
यशोगाथा तिच्या संघर्षाचीपाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही ह...
