वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?
वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?हा प्रश्न तितकासा बरोबर नाही कारण तेल केवळ वाळवंटातच मिळतं नाही असं नाही. ते अंटार्क्टिक प्रदेशातही मिळतं तसंच सागरी आखातात किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातही मिळतं. आपल्या बॉम्बे हाय आणि कृष्णा, गोदावरी खोऱ्यातील तेलांचे साठे याची प्रचिती देतात. तरीही वाळवंटात तेल मिळण्याच्या शक्यता जास्त आहेत, यात शंका नाही या काही भौगोलिक प्रदेशात ते का मिळतं हा प्रश्न उरतोच.याची दोन कारणं आहेत तेलाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि ते तयार झाल्या नंतर त्याचे साठे हलवले जाण्याची प्रक्रिया. पहिल्या प्रक्रियेसाठी सूक्ष्मजीव झटपट आणि ऑक्सिजन विरहित वातावरणात गाडले जाण्याची आवश्यकता असते. कारण अशा वातावरणातच त्यांच्यामधले हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामधले बंध शाबूत राहू शकतात, त्यांच्या पासून हायड्रोकार्बन रूपातल्या खनिज इंधनांची निर्मिती होऊ शकते असं वातावरण नद्यांच्या त्रि...
