महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..
महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊनगेली. आयुष्यभर संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मांडणी करून गेली. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच आपल्या ऐहिक जीवनाची समाप्ती केली. गुरुवार, दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण ग्रंथ,चष्मा एक इंजेक्शन सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले.निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. हे कळल्यावर सात कोटी दलि...
