भाड्याची सायकल..!
भाड्याची सायकल...!१९८०-९० चा काळ होता तो...त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो... बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा.
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...भाड्याचे नियम कडक असायचे जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी...मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.हे वाचा – अनाथांची नाथ बोहणी.!भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची...तेव्हा भाड्याने...

