शुगर, बिपी कंट्रोल कसे करावे?
शुगर, बिपी कंट्रोल कसे करावे ?* सीताफळ ठरेल उपयुक्त; फळ एक अन् फायदे अनेक.!शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे सर्वांत महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास किंवा व्याधी जडू शकतात. आताच्या घडीला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे आजार अगदी सामान्यपणे पाहायला मिळतात. या आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी अनेक गोष्टी सहाय्यभूत ठरू शकतात. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काही फळे उपयुक्त ठरू शकतात.डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे सुरू करावीत. मात्र, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी काही घरगुती उपायही प्रभावी ठरू शकतात. अनेक आयुर्वेदिक औषधे, मसाले आणि फळे यांचा आहारात समावेश करून रक्तदाब आणि मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येऊ शकते.बाजारात अनेक प्रकारची फळे उपलब्ध ...
