पांगलेला गाव.!
पांगलेला गाव.!नदी काठावरून दुरवर नजर जाईल जिकडे तिकडे हायब्रीडच हायब्रीड पेरलेली हिरवीगार शेतं.नदीकाठच्या डबक्या, डबक्यात साचलेल्या पाण्यावर ऑईल इंजिन बसवून वांग्याची ,टमाटयाची हिरवीगार डुंगे बहरलेली दिसायची.तयार होवून निंघालेली वांगी टमाटी विकायसाठी गावच्या आठवडी बजारात शेतकरी लोकं मांडायची.गावात पिक पाणी तसं चांगलं होतं.चांगली आबादानी होती. जो तो आपल्या मेहनतीत व्यस्त रहायचा. शेणपाणी आटपून रंगरावनं गोठ्यातील बैल मोकये सोडून त्याईच्या पाठीवर दोर टाकले. बैलांनी पाणी प्याले सरका नदीचा मार्ग धरलेला. बादशाहा भाईच्या नदीपल्याडच्या मईच्या वावरात आज हायब्रीडच्या वावरात डवऱ्याचा फेर होता.कायाभोर मईच्या वावरात कायभोर हायब्रीड चांगलं टोंग्या,मांड्या,बसलं होतं. वावरंही तसं ताकदचं म्हणजे हेल्याचं मस्तकच होतं.साजरं शेणखत व पुराच्या पाण्यामुळे येणारा सुपीक गायवटी भाग असल्यानं व घरच्याच दहा बारा बै...
