डॉ. बाबासाहेब यांची तत्वनिष्ठ पत्रकारिता
डॉ. बाबासाहेब यांची तत्वनिष्ठ पपत्रकारितासमाज जागृती व समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र .लोकांवर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे व जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांमुळे ज्ञान, माहिती, रंजन व प्रबोधन होते. ते लोकशाहीचा चौथा खांब आहे.कोणत्याही चळवळीमध्ये वर्तमानपत्रे खूप महत्त्वाची भूमिका फार पाडीत असतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या निश्चित भुमिकेतूनच पत्रकारितेकडे वळले होते. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ”पंखाश...
