Tuesday, December 23

Tag: कावळा…

पिंडाला शिवलाय कावळा…
Article

पिंडाला शिवलाय कावळा…

पिंडाला शिवलाय कावळा.."माझी काळी आई मला द्यायची नाही मला इकायची नाय, मला इकायची नाय" असं जीवाचा आक्रोश करत सखाराम ओरडून ओरडून सांगत होता, हाता पाया पडत होता पण निगरगट अधिकारी मात्र त्याचे ऐकायला तयार नाही, चारी बाजूने शेतात पोलीस तैनात करण्यात आले होते, जसं मयताच्या चारी बाजूने नातेवाईक, मित्र परिवार असतात अगदी तसं, इतर वेळेस जमीन इकायची किंवा खरेदी करायची असल्यास तालुक्याच्या गावी तहसील ऑफिसला जावं लागत होते, पण सखाराम जमीन द्यायला तयार नव्हता बाकी शेतकऱ्यांनी काहींनी मनाने तर काहींनी त्यांच्या मनाविरुद्ध जमिनी सरकारला खरेदी करून दिल्या होत्या, त्यामुळे आज तहसील ऑफिस सखारामच्या शेतात शेती खरेदी करायला आले होते. सखारामची सही घ्यायला आले होते, महामार्गाचे कामही सुरू झाले होते तरीही सखाराम त्याची काळी आई द्यायला अजिबात तयार नव्हता, अख्ख आयुष्य सखारामने जमीन कसली होती त्याचा जीव त्या काळ्या...