Sunday, November 9

Tag: #ओबीसी आंदोलन

आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!
Editorial

आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!

आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!गेल्या काही दिवसांत खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत आरक्षणासंबंधी केलेले विधान समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. "उद्या जर माझ्या मुलाने आरक्षण मागितले तर मला लाज वाटली पाहिजे" असे त्या म्हणाल्या आणि लगेचच या विधानावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. सुळे या संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदार म्हणून ओळखल्या जातात, त्यांचा राजकीय व सामाजिक वावर नेहमीच परिपक्व भासतो, पण आरक्षणावरील त्यांचे मत हे अर्धवट सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणारे आहे असे म्हणावे लागेल.आरक्षण हा विषय केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. तो आपल्या समाजाच्या असमान रचनेशी जोडलेला आहे. शेकडो वर्षांपासून जातीच्या नावाखाली लाखो लोकांना शिक्षण, व्यवसाय, जमीन, प्रतिष्ठा, समाजातील समान स्थान या सर्व हक्कांपासून दूर ठेवले गेले. गावकुसाबाहेर झोपड्या...
लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!
News

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!लातूर : लातूर जिल्ह्यातील आरक्षणाच्या संघर्षाने जिल्हा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाच्या ‘कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा’ या मागणीवर ओबीसी समाजाने तीव्र विरोध व्यक्त केल्याने दोन्ही समाजात तणावाची परिसीमा गाठली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या युवकाने ‘ओबीसी आरक्षण संपणार’ या भीतीतून आत्महत्या केली. गावात ओबीसी समाजातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केल्याने वातावरण हादरले आहे.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदासुरुवातीला भरत कराड यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये ‘मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण हिरावले जाण्याची भीती’ व्यक्त केली. तणाव शमत नाही तोच निलंगा तालुक्याच्या दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे...