Thursday, November 13

Tag: असणं

जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!
Article

जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!

जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!एका wp गृपवर काल मिसयुनीव्हर्सवरुन चर्चा सुरु होती ८० किलो वजनाची स्त्री स्पर्धेत उतरते त्यावरुन चाललेला चिवडा माझ्या वाचनात आला. आता सकाळी योगा करत असताना मी उठा बश्या काढत होते. जमीनीवर हात न टेकता मला उठबस करता येते म्हणजे मी फिट आहे. मी इंडीयन टॉयलेट मधे बसउठ करु शकते म्हणजे मी फिट आहे.मी खाली बसुन कपडे धुवु शकते किवा भांडी खाली बसुन घासु शकते,  फरश्या घासु शकते , माझे हात खाली वाकल्यावर पायाला लागतात किवा डोकं गुडघ्याना लागतं म्हणजेच मला पोट नाही आणि मी फ्लेक्झीबल आहे असही होवु शकतं. इंटरकोर्स करताना अनेक पोजेसचा मी सहज आनंद घेउ शकतो/शकते म्हणजे मी फिट आहे. कुठलही काम करताना माझं पोट मधे येत नाही आणि छोट्या कामाने थकायला होत नाही म्हणजे मी फिट आहे. यातलं कोणाकोणाला काय काय जमतं पहा कारण आपण सगळे मिसयुनीव्हर्स होणार नाहीत पण मिसहेल्दी, मिसॲक्टीव्ह, मिसॲट...