Monday, October 27

‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’

“आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी”

कोणतंही दैनिक उघडा,टिव्ही चॅनलवरवरच्या बातम्या पहा,रेडीयोच्या बातम्या ऐका त्यात किमान एकतरी बातमी आत्महत्येची असते.हे सर्व पाहून ऐकून अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की आधुनिक समाजात आत्महत्याची प्रवृती वाढत आहे.ही प्रवृती तारुण्यांच्या भरात असलेल्या व तारुण्याच्या उंबरवठ्यावर असलेल्या मुलामुलींमध्ये वाढत आहे.आपल्याला किती मौल्यवान,अमुल्य असं शरीर व जीवन मिळालेलं आहे.आणि आपण काहीतरी शुल्लक कारणांसाठी ते संपवत आहोत.आत्महत्या समाजाला लागलेली कीड आहे.ही कीड तरुण पिढीला पोखरत आहे.
      आत्महत्या कोण करतय? सांगा बरं , ज्यांचं मन दुबळं आहे,ज्याच्यांत जीवन जगण्याची धमक नाही,जो दुबळा,भित्रा भागूबाई आहे,जो जीवनातील आव्हनं स्विकारू शकत नाही तोच हा मार्ग स्विकारत असतो.जो मनाने कणखर आहे,स्वतःच्या जीवनाचा स्वतःच नायक आहे, जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हान स्विकारण्यास जो तयार आहे तो कधीच आत्महत्या करण्याचा विचार आपल्या मेंदूत,आत्म्यात घुसू देत नाही.तो येणाऱ्या संकटास धीटपणे,धाडसाने तोंड देण्यास नेहमीच सज्ज असतो.येणाऱ्या समस्या व संकटावर उपाय शोधत राहतो.
      विचार करा आत्महत्यासारख्या शुद्र खेळण्याशी खेळायला आपलं जीवन येवढं स्वस्त आहे का ? जीवनात येणाऱ्या समस्यांना संकटांना एकच उत्तर आहे धाडसाने,धैर्याने त्या समस्येला तोंड देणे,त्यावर मात करणे.निसर्ग म्हणा की देव  जेव्हा तो माणसासाठी एक दरवाजा बंद करतो तेव्हा त्याच वेळी दुसरा दरवाजाही खोलून दिलेला असतो.कांही तरुण स्व:ताची इछा आकांक्षा पूर्ण झाल्या नाही तर ते निराशेचा गर्तते,चक्रव्यूहात आडकतात.मग ते आत्महात्येचा विचार करू लागतात.यावेळी ते आपली कुवत,क्षमता विसरतात.परिश्रमांशिवाय यश नाही हेही ते विसरतात.
      तुम्हाला नवल वाटेल पण सुप्रसिद्ध समाजसेवक आण्णा हजारे हेही आत्महत्या करायाला निघाले होते.पण, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना स्वामी विकानंदाचे एक पुस्तक वाचायला मिळाले.त्यात एक वाक्य होतं, " धन्य ती माणसे जे दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांच्या सेवेसाठी,कल्याणासाठी स्वतःचं शरीर झिजवतात.'' आण्णा हजारे यांना हे वाक्य पटलं.आत्महत्या करून आण्णा हजारे जंगलातील कावळे,गिधांड यांना शरीर आर्पण करणारे होते ते आत्महत्येचं विचार सोडून परत येवून गाव सेवा करू लागले.गावाचा चेहरामोहरा बदलला.आत्महत्येनंतर त्याचं शरीर कदाचीत कावळे,गिधांडला आर्पण झालं असतं ; पण आज त्यांच्या शरीरासमोर हजारो माणसं नतमस्तक होत आहेत हे आपण पहातोय.जे स्वतःसाठीच जगत असतात ते जीवंत असुनही मेल्यासारखेच असतात.निसर्ग सगळं जाणतोय.तो स्पंजासारखा आहे.बरं वाईट शोषून घेतो.
    तुम्हाला भौतिक सुख मिळाल नाही म्हणून तुमचं मनोभंग होतं.तुम्ही खिन्न,उदासिन होता ;पण थोडसं सकारात्मक विचार करा ना. तुमचं जीवन केवळ शुल्लक कामासाठीच आहे का ? एखादी गोष्ट तुम्हाला जमली नाही,करता आली नाही म्हणजे तूम्ही सक्षम नाही का ?निसर्गाकडे पहा जीवन जगण्यासाठी आनंत वाटा आहेत.निसर्गातील अनेक गोष्टीपासून तुम्हाला सुख शांती समाधान मिळू शकते.यामुळेच तुम्ही निराशा,उदासिनता,रोग,दुःख यावर विजय मिळवू शकता.एक लक्षात ठेवा जीवनात आलेलं संकट हे तुमच्यासाठी संधी निर्माण करत असतात.संकटचं जीवन जगण्याच मार्ग दाखवत असतात.संकटं ही जीवनासाठी वरदान ठरत असतात.जे दुःखातून, संकटातून काही तरी शिकतात,धडा घेतात ते खरे भाग्यवान आहेत.जे मनाने डरपोक,दुबळे,पळपुटे आहेत तेच आत्महत्येचा मार्ग अनुसरतात. संकटातून मार्ग निघू शकतो ही प्रबळ इच्छा आसणारा तरुण/तरुणी त्यावर उपाय शोधून काढते.तोडगा निघू शकते ही प्रबळ इच्छा आसणारा तरुण/तरुणी त्यावर उपाय शोधून काढतो.
      तरुण/तरुणी आत्महत्या का करतात ?
      १ ) काही तरुण/तरुणींचं लग्न जुळत नाही म्हणून. तर कोणाचं प्रेमभंग होतंय म्हणून. तर कोणाचं लग्न टिकत नाही म्हणून.लग्नानंतर ती/तो एकमेकांच्या मनासारखं वागत नाही म्हणून,भौतिक सुखांची,इच्छा आकांक्षाची पूर्तता होत नाही म्हणून.एकमेकांवर अविश्वास दाखविने , मोबाईल फोनवर जादा वेळ बोलत राहणे.मुलगी/मुलगा पसंत नाही,मनाविरुद्ध लग्न होणे,आई बाबा लाड करत नाहीत, फाजील गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे देत नाहीत.
      आरे बाबानो आत्महत्या करण्यापूर्वी तुम्ही जरा विचार करा,जन्म,मृत्यू,लग्न हे काही आपल्या हातात नाही.निसर्गच हे घडवून आणते आसे आपले पूर्वज सांगून गेलेत ना.प्रेमात आपयश आलं,लग्न जूळत नाही म्हणून कुठं आत्महत्या करायची असते का ?तुम्ही थोडसं विचार करा हे निसर्गाच्या /देवाच्या मनात नाही. यामुळे आपल्या जीवनात पुढे येणारे एखादे मोठे संकट टाळण्यासाठी ही निसर्गाचीच योजना असेल असे समजा ना.जवळच पाहू नका.दूरदृष्टी ठेवा.भविष्याचं विचार करा.प्रेमविवाह टिकतातच आसे नाही.पुढे येणाऱ्या गंभीर समस्या यामुळे टळतील.प्रेमभंग झालं म्हणजे तुमच्यावर आभाळ कोसळलं की काय ?यात आपल्या आईबाबाचं विचार कधी केलात का ? त्यांच्या मनाचा, भावनांचा,त्यांच्या म्हातारपणांचा विचार कधी केलात का? त्यांची काळजी तुम्ही घेणार नाहीत का ?तुमच्या प्रेम प्ररकणात तुम्ही त्यांच्यापासून हिरावले जाता तेव्हा त्यांच्या काळजाचे हजारो तुकडे तुकडे होतात याचं विचार तुम्ही कधी केलात का ?तुमचं पाप लपविण्यासाठी तुम्ही आत्महत्या करता ;पण मरण्याच पाप तुमच्या हातून होत आहे याचंही विचार करा ना. 
       २ ) एखाद्याच्या हातून जघन,भंयकर दुष्ट पाप घडणे,किवा गुन्हा घडणे,निंदणीय काम घडणे,स्वतःलाच अपराधी समजणे,हातून घडलेल्या गोष्टी आई बाबाला सांगता येत नाही. वाईट जीवन जगण्यापेक्षा स्वतःला संपवलेलं बरं . मरण पत्करलेलं बरं. यामुळे ही आत्महत्या करतात.
      आत्महत्येनंतर तुम्ही तुमचे प्रश्न कसे सोडवणार आहात.मग आत्महत्या न करता प्रश्न समस्या सोडवा ना.थोडं विचार करा आत्महत्येनंतर तुमच्या पूर्ण कुटूम्बाची काय अवस्था होते ? काय दशा होते याचं विचार आत्महत्यापूर्वी करा.तुमच्या कुटूम्बाला शरमेने खाली मान घालून जगण्याची संधी प्राप्त करून देवू नका.आपल्या हातून घडलेलं पाप धूवून काढण्याची शक्ती निसर्गाने दिलेली आहे.पुढे आपण गुणवान,गुणवंत बनू शकतो.प्रत्येक पापकृत्य करणाऱ्याला भविष्यकाळ असते याचा विचार करा. झालेल्या चूकांची पुनरावृती टाळा.वाईट विचार सोडा.तुमची मानसिकवृती बदला.निश्चितच तुमचं भविष्य उज्ज्वल,तेजोमय होवू शकते.वाल्याचं वाल्मीकी झाल्याचं आपण रामायणात वाचतो की नाही.
      ३ ) स्वतःलाच गौण समजणे,मी इतरापेक्षा हलका,न्यूनतम आहे.मी इतरापेक्षा ढ आहे.मी इतरापेक्षा मागे राहीलो.माझे सर्व मित्र चांगल्या पोस्टवर आहेत.ते सर्व सुखी,श्रीमंत घरातले आहेत.त्यांचापेक्षा मला हालक्या दर्जाचे काम मिळाले आहे.मी माझ्या आईबाबांची इच्छा, मनोकामना पूर्ण करू शकलो नाही.मग जीवन जगून काही उपयोग आहे का ?
    वरील गोष्टीचा विचार का करता.लक्षात ठेवा की या जगात अन्नाच्या एका घासासाठी कोट्यवधी लोक संघर्ष करीत आहेत.त्यांना ना घर आहे ना दार.सताड उघडया जागी आभाळाचं छत डोक्यावर आहे असे समजून जीवन जगत आहेत. यांचा विचार तुम्ही का करत नाही.दुसऱ्यांची माडी पाहून आपली झोपडी का जाळता.रस्त्यावर जीवन जगणाऱ्यापेक्षा तुम्ही चांगले नाहीत का ? तुम्हाला पोटापुरते मिळालेले आहे.तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला चांगले आईवडील मिळालेले आहेत.त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला शिक्षण दिलेले आहे.आतापर्यंत तुमची काळजी घेत तुम्हाला लहानाचे मोठे केलेले आहे.तुम्ही स्वतःच्या पायावर थांबावे म्हणुन कष्ट उपसत आहेत.आरे बाबांनो या जगात तुमच्या जागेवर तुम्ही फिट आहात.दुसऱ्यासोबत स्वतःची तुलना का करता ?तुम्ही इतरापेक्षा वेगळे आहात. तुम्हालाही तुमच्यातील क्षमतेनुसार चांगले कार्य , चांगली निर्मिती करता येते यांचा विचार करा. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रामाणिकपणा,समर्पन,कठिन परिश्रम आणि विश्वासहार्यता कमवावीच लागेल.यशाचा मार्ग यातूनच जात असतो.याद्वारेच यशोशिखर तुम्ही गाठू शकाल.लोक पहावे म्हणून यशोशिखर चढू नका तर तेथून तुम्हाला जग पहाता यावे म्हणून चढा.कोणतंही काम उच निच दर्जाचं नसते. स्वतःला मोठं समजू नका.हे हलकं काम मी कसं करु असं म्हणू नका.काम करण्यास लाजू नका. जो स्वतःची मदत स्वतः करतो देव त्यालाच मदत करत असतो.धैर्य,संयम व सहनशिलता बाळगा. संघर्ष करायला शिका.यश मिळतेच. शुल्लककारणासाठी जीवन संपवू नका.पैशामुळे माणूस नाही.माणसामुळे पैसा आहे.पैसा हाताचा मळ आहे.संधीची केवळ वाट पहात बसू नका. संधी मिळेलच तरीपण संधी निर्माण करा.आत्मविश्वास बाळगा,धैर्य ठेवा,धोका स्विकारा,आव्हाणाला सामोरे जा.यश तुमचंच आहे.   
       ४ ) परीक्षेत मात्र खुप कमी गुण मिळाले, आता घरच्यांना कसं तोंड दाखवू.परीक्षेत अपयश आलय,गल्लीत/गावात मी एकटाच नापास झालोय,आता आई बाबा मला रागवतील,मारतील,शिक्षा करतील,धमकावतील. मग जीवन संपवलेलच बरं.
        वेड्या भावा बहिणीनो आरं थोडंसं समजून घ्या.शाळा कॉलेजाची परीक्षा म्हणजे जीवन आहे का ? भरपूर अभ्यास करून अपयश आलं म्हणून खचून जायचं,जीवन संपवायचं का ?अपयश ही यशाची पाहिली पायरी आहे.कौशल्य , सतत प्रयत्न व बुद्धी याच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता.आरे विचार करा ज्यांनी आपल्याला जन्म दिलंय,हे सुंदर जग दाखवलय, लहानाचं मोठं केलय,त्यांनी थोडं बहूत तुमच्याच हितासाठी टोकलं तर काय झालं.तो त्यांचा अधिकार आहे.विनाकारण भावनात्मक होवून भावनेच्या भरात वाहून जावू नका. आईबाबांसमोर घाबरु नका धीट व्हा. त्यांच्यासमोर मन मोकळं करा.तुमच्यातील क्षमता तुम्ही ओळखा.सगळेच प्रथम श्रेणीत उतीर्ण होवू शकत नाही.सगळेच नोकरीला लागणार नाहीत. तुमच्यातील गुण तुम्हीच शोधा.त्यानुसार खेळ , राजकारण,समाजकारण,व्यवसाय,कलाक्षेत्र , गायन,वादन,कवी,लेखक,नाटककार बना. जीवनात नकारात्मकता घेवून फिरू नका.तुमच्या धैयाविषयी घरच्यांशी बोला.शाळा न शिकताही वैज्ञानिक झालेले आहेत.तुम्ही इतर कोणापेक्षाही कमी नाही.जो तो त्याच्या जागेवर परिपूर्ण आहे. निसर्गाने/देवाने दिलेले हे जीवन सहज संपाविण्यासाठी दिलेले नाही.
   आत्महत्या रोखता यईल का ?
      मला वाटते सहन न होणाऱ्या शारिरीक व मानसिक दु:खामुळे माणुस शेवटचं टोक गाठतोय ते म्हणजे आत्महत्या.शारिरीक व मानसिक दुःख हे आत्महत्या करण्याकडे जाण्याचं मार्ग आहे.जीवनात कधी गरमी तर कधी थंडी,कधी आनंद तर कधी दुःख येत असते.या गोष्टीचं येणं आणि जाण्याचं चक्र कायम चालू राहते.जीवनात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात.कधी कधी आपणास शिव्यांची लाखोली वाहिली जाते. आपणास राग येतो.रागाच्या भरात आपण बरेवाईट करून बसतो.वडीलधारी माणसं सांगतात राग आणि भिक माग. राग आलं तर मारण्यासाठी जमीनीत गडलेलं दगडं उकरून काढा.राग कमी होईल.थोड़ा वेळ शांत व्हा.बहिरे बणा.मुके व्हा.सगळं काही शांत होईल. जीवनातील चांगल्या वाईट घटनांना समर्थपणे तोंड द्यायला शिका.कुरकूर केल्याने व रडल्याने, आत्महत्या केल्याने प्रश्न मिटत नसतात. 
      आत्महत्येचा विचार आला तर खालीत बाबीचा विचार करा .
       १ ) तुमच्या मनातल्या भावना मनातच दाबून ठेवू नका.त्या भावनांना वाट करून द्या. तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर मित्र मैत्रिनीसमोर मांडा.मन मोकळं करा.त्यामुळे तुमचं मन,हृदय, मेंदू हलकं फुलकं होईल.
      २ ) घराच्या एका कोपऱ्यात एकांत बसून तुमच्या समस्यांना कोंबडी आंड्याला उबवत बसते तसे उबवत बसू नका.तुम्हाला आवडणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या.शक्यतो एकटे एकटे राहण्याचं टाळा.
     ३ ) समजा घरात,समाजात तुमचं मन हलकं करण्यासाठी कोणीच भेटलं नाही तर निसर्गावर/देवावर किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीवर श्रध्दा ठेवून त्यांची मनोमन आठवण करा,त्यांना भजा.तुमचं मन मोकळं करा. मनावरचा बोजा हालका होईल.
     ४ )संकटापासून दूर पळू नका.त्याला धैर्याने तोंड द्या.येणारे/आलेले संकट जीवनात प्रगती करण्यासाठी मिळालेले वरदान समजून त्यास तोंड द्या.संकटामुळे भूतकाळातील चूका सुधारण्याची संधी मिळते व भविष्यासाठी सतर्क राहता येते.निसर्गावर विश्वास ठेवा.मन शांतीसाठी देव/निसर्गाची प्रार्थना करा.संकटापासून दूर पळण्यासाठी नव्हे तर संकटावर मात करण्यासाठी मनशक्ती तयार करा.
         ५ ) दुबळ्या मनाला कणखर बणविण्यासाठी,आत्महत्येच्या विचारापासून दूर दूर जाण्यासाठी भक्ती गीत,संगीत ऐका.मनाला, मेंदूला,हृदयाला शक्ती देणारं,चैतन्यदायी एखादी साहित्यकृती वाचा.एखाद्या प्रभावी वक्त्याचं भाषण ऐका.किर्तन ऐका.नकारात्मक विचारापासून नेहमीच दूर रहा.
            ६ ) धार्मिक,ऐतिहासिक ठिकाणी पर्यटनाला जा.यामुळे तुमच्या मनावरचा तान, बोजा कमी होईल.तुमच्यात नवचैतन्य निर्माण होईल.मानात येणारे घातक विचार निघून जातील. या सुंदर जगात सुंदर जीवन जगावे असे वाटेल.
         ७ ) चांगले विचार,चांगली आक्कल ही शहाण्या माणासाबरोबर बसल्याने येते.म्हणून चांगल्या सुविचारी माणसांच्या सानिध्यात नेहमी रहा.त्यांचा नियमित सल्ला घ्या.
        ८ ) जीवनात नेहमीच दक्ष रहा.व्यवहारी बना.स्वतःची काळजी घ्या.मुर्ख बणविणाऱ्या, लबाड,ढोंगी व फसव्या माणसांपासून चार हात आंतर ठेवून वागा.विचार न करता केलेली कृती नेहमीच माणसाला संकटाच्या खाईत लोटते व सर्व दुःखाचे कारण ठरते.क्षणिक फायद्याचे विचार टाळा.या गोष्टी कधीही विसरु नका.
       ९ ) निसर्ग म्हणा की देव म्हणा हा सर्वांचा निर्माता आहे.आपण सर्व त्यांच्या छाया छात्राखाली आहोत.आपलं संरक्षण निसर्ग करत असतो.आपण निसर्गावर विश्वास ठेवू या.त्याची साधना,अराधना करू या.आसं म्हणतात की , निसर्गाला मुंग्या चालताना मुंग्याच्या पावलांचा ही आवज येतोय.म्हणून लक्षात ठेवा आपल्या सुख दुःखात निसर्ग आपला सोबती आहे.असं म्हणुन मनावरचा तान कमी करा .
      १० ) दिवसं येतात जातात.संकटही येतात जातात.मित्रांनो शेवटी येवढं तरी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या मनात आत्महत्येचा विचार येईल तेव्हा येवढचं लक्षात ठेवा " हा ही दिवस निघून जाईल.सुख येईल. "
-राठोड मोतीराम रुपसिंग.
" गोमती सावली '', काळेश्वरनगर ,
विष्णुपूरी,नांदेड -६.
९९२२६५२४०७.


आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

·         * नम्र निवेदन 
"भयमुक्त आणि चाटुगिरीविरहित पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे..."

लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
QR 1


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.