Sunday, October 26

सुहागरातची गेली शान; वरानं मिटले डोळे, गेला प्राण!

सुहागरात मृत्यू – ७५ वर्षीय वर आणि ३५ वर्षीय नवरीची जौनपूरमधील धक्कादायक कथा

जौनपूर (उत्तर प्रदेश): प्रेमाचं वय नसतं, पण त्याला ‘प्राणाचा भाव’ जरूर असतो हे जौनपूर जिल्ह्यातील या घटनेनं ठळकपणे दाखवून दिलं आहे. ७५ वर्षीय संगरू राम नावाच्या वृद्धानं आपल्या वयाच्या निम्म्या ३५ वर्षीय मनभावतीशी लग्न केलं, आणि गावात नव्या आयुष्याचा जल्लोष सुरू झाला. मात्र आनंदाचं हे क्षणक्षणात दु:खात रूपांतर झालं. सुहागरातच्या दुसऱ्याच सकाळी संगरू राम यांचा मृत्यू झाला, आणि संपूर्ण गावात हळहळ व कुजबुज सुरू झाली.

संगरू राम हे गौराबादशाहपूर तालुक्यातील कुच्छमुछ गावातील शेतकरी होते. एक वर्षापूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. लेकरं नव्हती; शेती, जनावरं आणि एकटेपण हेच त्यांच्या आयुष्याचं साथीदार झालं होतं. घरच्यांनी सांगितलं, “अहो आता वय झालं, लग्नाचं काय?” पण संगरू म्हणाले, “वय वाढलं तरी मन म्हातारं झालं नाही!” आणि मग त्यांनी जलालपूर तालुक्यातील ३५ वर्षांच्या मनभावतीशी लग्न ठरवलं.

२९ सप्टेंबरला कोर्ट मॅरेजनंतर मंदिरात सात फेरे झाले. गावात ढोल, ताशे, आणि नाचगाणी सुरू झाली. चहाच्या टपरीवर चर्चा होती “बाप्यानं पुन्हा लग्न केलं रे!” संगरू आनंदानं म्हणाले होते, “तू आलीस म्हणून घरात पुन्हा उजेड आला.मात्र हा उजेड दुसऱ्याच दिवशी काळोखात बदलला. सुहागरातच्या रात्री उशिरापर्यंत दोघं बोलत राहिली. पहाटे अचानक संगरूंची तब्येत बिघडली. छातीत दुखू लागलं, श्वास घ्यायला त्रास झाला. घरच्यांनी रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आनंदाचा दिवस क्षणात शोकांत बनला.

गावात हळहळ व्यक्त झाली, पण चर्चा मात्र थांबली नाही. कुणी म्हणतं “बाप्या प्रेमात गेला!” तर कुणी म्हणतं “असं वय झाल्यावर प्रेम केलं की हृदय पेलत नाही!” काहींनी तर संशयही घेतला “इतकं अचानक कसं काय झालं?”

दरम्यान, दिल्लीहून आलेल्या संगरूंच्या पुतण्यांनी चिता पेटवण्यास नकार दिला आहे. त्यांचा आग्रह “आधी चौकशी झाली पाहिजे!” त्यामुळे आता पोलिस चौकशीची शक्यता निर्माण झाली आहे.गावात मात्र या घटनेनं नव्या चर्चेचा विषय निर्माण केला आहे. कुणी हसतं, कुणी रडतं, तर कुणी टोमणा मारतं “प्रेमाचं वय नसतं म्हणे, पण श्वासाला लिमिट असते!” चौपालवर आजही सगळे म्हणतात “सुहागरातची गेली शान; वरानं मिटले डोळे, गेला प्राण!”

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

75 साल के दूल्हे की 35 साल की महिला से शादी

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.