Sunday, October 26

बँकेत ठेवला चेक… आणि तोच झाला ‘चोरांचा बोनस’! सोलापुरात शेतकऱ्याला ४ लाखांचा फटका, CCTVने उघड केला कलियुगाचा खेळ!

सोलापूर : “बँक म्हणजे सुरक्षितता” असं म्हणतात, पण आता बँकेचे ड्रॉप बॉक्सही चोरट्यांच्या हाती खेळण्यासारखे झाले आहेत! सोलापुरातील एका शेतकऱ्याचा चार लाख रुपयांचा चेक बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतूनच चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोयाबिन विकून कंपनीकडून मिळालेला ₹४ लाखांचा चेक बँकेत जमा करण्यासाठी शेतकरी गेला. काही दिवसांनी खात्यात पैसे जमा झाले नाहीत, म्हणून तपास घेतल्यावर धक्काच बसला “खात्यात पैसेच नाहीत!”

चौकशी दरम्यान समजलं की, ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेला तोच चेक एका हुशार चोरट्याने “स्लिपमध्ये दुरुस्ती”च्या बहाण्याने बाहेर काढला आणि दुसऱ्याच खात्यावर वटवला! बँकेने सुरुवातीला शेतकऱ्याचाच दावा फेटाळला, पण CCTV फुटेजने सत्य उघड केलं.

या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला असून विजापूर नाका पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले की, “बँकेच्या दोन शाखांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. तपास सुरु असून संबंधित चोरट्याचा शोध घेत आहोत.”

दरम्यान, लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे “आता चेक टाकायलाही बघून टाका, नाहीतर बँकेतच चोर बसलेत का काय?”

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.