Monday, October 27

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड–नागपूर विशेष रेल्वे सेवा सुरु

"धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नांदेड–नागपूर विशेष रेल्वे गाडी"

नांदेड : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड रेल्वे विभागातून नांदेड ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. नागपूर येथील दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाला जाणाऱ्या अनुयायांना या विशेष गाड्यांचा मोठा लाभ होणार आहे.

नांदेड रेल्वेस्थानकावरून १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.२० वाजता नांदेड–नागपूर (गाडी क्र. ०७०८५) ही विशेष गाडी सुटेल. ही गाडी मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळकुट्टी मार्गे धावेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता नागपूर पोहोचेल.

त्याचप्रमाणे, २ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५५ वाजता नागपूर–नांदेड विशेष गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता नांदेड पोहोचेल. दुसरी विशेष गाडी नांदेड–नागपूर–नांदेड मार्गावर पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावेल. ही गाडी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वाजता नांदेडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूर पोहोचेल.

नागपूरहून नांदेडसाठी ही गाडी ३ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता सुटेल आणि सकाळी ११ वाजता नांदेड पोहोचेल. या गाडीत एकूण २० डबे असतील. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुयायांसाठी ही विशेष रेल्वे सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.