नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा
मुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच आकाशही रंगतदार होणार आहे. २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण राहणार आहे.
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि विदर्भ-मराठवाड्यासह अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार सरींची शक्यता आहे.
महामुंबई परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या सरींची नोंद झाली.
ढगाळ वातावरण आणि उकाडा
नवरात्र व दुर्गापूजा दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढेल. पुढील आठवड्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसासोबत उकाड्याचाही फटका मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना बसू शकतो.
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
