लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!

लातूर : लातूर जिल्ह्यातील आरक्षणाच्या संघर्षाने जिल्हा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाच्या ‘कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा’ या मागणीवर ओबीसी समाजाने तीव्र विरोध व्यक्त केल्याने दोन्ही समाजात तणावाची परिसीमा गाठली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या युवकाने ‘ओबीसी आरक्षण संपणार’ या भीतीतून आत्महत्या केली. गावात ओबीसी समाजातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केल्याने वातावरण हादरले आहे.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

सुरुवातीला भरत कराड यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये ‘मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण हिरावले जाण्याची भीती’ व्यक्त केली. तणाव शमत नाही तोच निलंगा तालुक्याच्या दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे यांनी ‘महादेव कोळी जात प्रमाणपत्र’ न मिळाल्याने मुलांच्या शैक्षणिक नुकसानाच्या तणावात आत्महत्या केली. ‘मी मजुरीवर घर चालवतोय, लेकरांना महादेव कोळी प्रमाणपत्र मिळत नाही, म्हणून जीवन संपवतो’ असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

या घटना योगायोग नसून आरक्षणाच्या राजकारणामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचे पडसाद आहेत. एका बाजूला मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक, तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचा विरोध वाढतो आहे. त्यातच महादेव कोळी समाजाच्या प्रलंबित प्रमाणपत्र समस्येमुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य सरकारसमोर सर्वसमाजाला न्याय देतानाच कुणाच्याही हक्काला धक्का लागू नये, ही मोठी आणि नाजूक जबाबदारी आहे. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी समाजांनी व्यापक आंदोलनाची हाक दिली आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने तात्काळ समन्वय व समतोल धोरण न राबवल्यास, आरक्षणाच्या वादात आशा विखुरलेल्या तरुणांचे जिवंत मोल राहणार नाही..!



·  नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR 1

आरक्षणाच्या राजकारणात लातूर जिल्हा पेटतोय..

Avatar photo

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.