
ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!
मुंबई :‘लाडकी बहिण योजना’च्या लाभार्थींना पुन्हा एकदा थोडीशी चिंता लागली आहे. कारण योजनेत मोठं अपडेट आलंय — आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. पण यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे * सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी नसेल तर थांबणार का?
यावरून राज्यभरात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याआधीच ई-केवायसीचं ‘भूत’ लाडक्या बहिणींच्या डोक्यावर आलं आहे.
अधिकृतरीत्या सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी पुढील महिन्यांपासून विशेषतः नोव्हेंबरचा हप्ता ई-केवायसी पूर्ण न झाल्यास थांबवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे पोर्टलवरील तांत्रिक समस्या. अनेक लाभार्थी बहिणींना ई-केवायसी करताना अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय — काहींचं अपलोड होत नाही, तर काहींची माहिती जुळत नाही.
सरकारने दोन महिन्यांचा अवधी दिला असला तरी या काळात प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्त्यांना ‘ब्रेक’ लागू शकतो. सध्या तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता थांबवण्यात आलेला नाही, पण बहिणींनी खबरदारी म्हणून लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करणं हितावह ठरणार आहे.
थोडक्यात:
👉 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक
👉 सप्टेंबर–ऑक्टोबरचा हप्ता थांबवण्याचा निर्णय नाही
👉 नोव्हेंबरपासून ई-केवायसी नसेल तर हप्ता थांबू शकतो
👉 पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी त्रस्त
लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर!