नग्न

कुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!
अकोला : जिल्ह्यातील आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत घडलेला एक विकृत प्रकार सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडत आहे. कुस्तीच्या रिंगणात घाम गाळायचा, पण इथे तर संस्कारच गाळले गेले! चौदा वर्षांच्या अल्पवयीन कुस्तीपटूचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या प्रशिक्षकाच्या कारनाम्याने पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमी थक्क झाले आहेत.
अकोला पोलिस हॉलमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी आंतरशालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे कुस्तीपटूंचं वजन घेण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा उपस्थित असलेल्या प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याला विवस्त्र अवस्थेत उभं करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला. एवढ्यावर न थांबता, त्या मुलाला शिवीगाळ करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि काही वेळातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला!
या घटनेमुळे मुलगा तीव्र मानसिक तणावाखाली गेला असून, त्याच्या वडिलांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बीएनएस कलम २९६, ३५१(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, चौकशीत आणखी गंभीर माहिती समोर आली आहे. आरोपी प्रशिक्षक कुणाल माधवे यांच्याविरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र बदनामीच्या भीतीने अनेक पालक गप्प राहिले होते. सध्या पोलिस त्यांचा मोबाईल तपासत असून, इतर विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आणि फोटो सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धक्कादायक! आधी विवस्त्र करून केलं वजन….