जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 
◆ टॉमेटो मध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं.
◆ स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं.
◆ चेरी मध्ये आढळून येणारं एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.
◆ लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात.
◆ बीट मध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन-सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.
◆ डाळिंब मध्ये असणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत करतात.
◆ सफरचंद मध्ये असणारी अ‍ॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका कमी करतं.
-दिनेश  विष्णु  ढोले   
98503 25069
पुणे

Leave a comment