‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान व डीऑन पब्लिशिंग हाऊस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “किनारे सरकत आहे” या आंबेडकरी गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा १० ऑगस्ट २०२५, रविवारी दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमटेकडी परिसर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.
गझलकार नंदकिशोर दामोदरे ‘नंदा’ यांनी लिहिलेल्या या संग्रहात सामाजिक वास्तव, तळागाळातील वेदना आणि परिवर्तनाची आंबेडकरी प्रेरणा उमटलेली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय घरडे असून, प्रमुख अतिथी म्हणून अरुण भी विघ्ने, डॉ. मनोज सोनवणे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रोशन गजभिये करणार आहेत.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
दुपारी दोन वाजता “आंबेडकरी गझलप्रज्ञा” या विशेष सत्रात गुलाब मेश्राम, विनोद बागडे, अनिल अगम, देवीलाल रवराळे, प्रवीण कांबळे, अमृता मनोहर, रत्ना मनवरे, सुनीता मेश्राम हे प्रतिभावान गझलकार सहभागी होणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता संग्रहाचे औपचारिक प्रकाशन होणार असून अध्यक्षस्थानी सुदाम सोनुले (ज्येष्ठ आंबेडकरी गझलगार) असतील.
प्रकाशन प्रा. डॉ. अशोक पळवेकर (ज्येष्ठ आंबेडकरी समीक्षक तथा कवी) यांच्या हस्ते होणार असून, प्रमोद वाळके ‘युगंधर’ आणि प्रशांत वंजारे यांचे भाष्य लाभणार आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
या कार्यक्रमात अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ, संबोधी, गाथा प्रकाशन, वजी संदेश, शब्दास्त्र मंच, राईटवे फाउंडेशन, शिल्पकार फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ही एक प्रभावी, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक साहित्यिक भेट ठरणार आहे.
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
–बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
- नम्र निवेदन
“भयमुक्त आणि चाटुगिरीविरहित पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
–बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
