Monday, October 27

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई

कैलास कुंटेवाड KBC मध्ये 50 लाख जिंकताना, अमिताभ बच्चन सोबत

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी कौन बनेगा करोडपती (KBC) या कार्यक्रमात मोठा पराक्रम केला आहे. कैलास यांनी एकही लाईफलाईन न वापरता तब्बल ५० लाख रुपये जिंकले.

सोमवारी प्रसारित झालेल्या भागात कैलास यांनी सलग १४ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत सर्वांना थक्क केले. शेवटी १ कोटी रुपयांसाठी १५ वा प्रश्न समोर आला. त्यांनी लाईफलाईन वापरूनही खात्री न पटल्याने ५० लाखांच्या रकमेसह गेम क्विट केला.

कैलास हे व्यवसायाने शेतकरी असून महिन्याला फक्त ३-४ हजार रुपयांचीच कमाई होते. मात्र, त्यांच्या डोळ्यात क्रिकेटचं स्वप्न आहे. स्वतःला क्रिकेटपटू होण्याची संधी न मिळाल्याने आता आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

अमिताभ बच्चन यांनी कैलास यांच्या ज्ञानाची व चिकाटीची दाद देत त्यांचं कौतुक केलं. शेतकरी असूनही आपल्या मेहनतीने KBC मधून लाखो रुपये जिंकून कैलास यांनी सर्व मराठवाड्याला अभिमान वाटेल असं यश मिळवलं आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.