
कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
अमरावती (प्रतिनिधी) : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 18 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कैदी कैलास (वय 40) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी ती ड्युटीवर असताना शौचालयात गेली होती. त्याचवेळी आरोपी कैद्याने शौचालयाचा दरवाजा ढकलून जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याने चुकीच्या नजरेने पाहत कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपी हा सध्या आजीवन कारावास भोगत असून त्याच्यावर अतिरिक्त गुन्हा दाखल झाला आहे.
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
