Monday, October 27

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!

(पिंपळखुटा/स्वाती इंगळे)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी गौरी खापरकर हिने आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.

ही जलतरण स्पर्धा श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती येथे पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गौरीने ५० मीटर फ्री स्टाईल५० मीटर बॅकस्ट्रोक गटात आपली सरस कामगिरी सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

गौरीच्या या यशामागे प्रा. मनीषा लांडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे उद्घाटन मा. दिलीप इंगळे, प्राचार्य डॉ. सी.एम. प्रा. देशमुख, डॉ. शशांक देशमुख, श्री अभय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

गौरीच्या यशाबद्दल महाविद्यालय अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, प्राचार्य डॉ. सी.यू. पाटील, तसेच प्रा. दीपक बोंद्रे, प्रा. पवन शिवणकर, प्रा. अनिल चव्हाण, प्रा. निलेश शेळके, श्री प्रमोद नागपुरे, तेजस नागपुरे आणि संपूर्ण महाविद्यालय परिवाराने अभिनंदन केले.


आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

·    नम्र निवेदन 

"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह  पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे..."

लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.

या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
QR 1


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.