Friday, December 5

Story

Story

आजही अधांतरीच..!

जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावाकडे परत येत होतो.वाटेतच दिपाचे गाव लागले.गाडीचा रोख तिच्या गावाकडे वळवून दीपाच्या घरी आलो.तिच्या घराजवळ गाडी थांबताच आणि तिच्या घरात प्रवेश करताच तिला आश्चर्यचा धक्का बसला.कारण तिने वारंवार घरी येण्याचे निमत्रण देऊन सुध्दा तिच्या कडे जाण्याचा योग काही येत नव्हता.अचानक तिच्याकडे जाण्याचा योग आला.आम्ही घरात प्रवेश करताच ती करीत असलेली कामे बाजूला सारून आमचे आगत-स्वागत केले. आदर सत्कार केला.इकडील-तिकडील विचाराच्या देवाणघेवाणीनंतर तिच्या वैभवशाली घराकडे नजर फिरवून अलगदपणे विचारले की,छान संसार थाटला.चांगली प्रगती दिसतेय.तुम्ही तर चांगलाच जम बसविल आहे.शून्यातून विश्व निर्माण करून दाखविले आहे.त्यांची अल्पावधीतील प्रगती पाहून मन भरून आले.तुमच्या कर्तृत्वला दाद द्यावी लागेल.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.ममतेचा सागर आहात. प्रेमविवाह करणाऱ्यां जोडप्यासाठी खरा आदर्श आहात.असे बोलत...
Story

प्राक्तन

दोन दिवस लेकराचा ताप उतरेल म्हणून तिने वाट पाहिली. पण ताप काही केल्या हटत नव्हता. तेव्हा तिने कामावरून परतताच बाळाला पदराआड गुंडाळले आणि गाडीतळावर जाऊन उभी राहिली. कुणाची बैलगाडी तरी मिळेल या आशेवर होती ती! पण तिचे दुर्दैव की कोणाचीही बैलगाडी आली नाही. पदराखाली गुंडाळलेले लेकरू तापाच्या भरात बरळू लागले तसे सगुणाने चालत दवाखाना गाठण्याचे ठरविले नि ती झपझप चालू लागली. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. अंधार मी म्हणत होता. पण बाळाच्या स्वास्थ्यापायी तिला कशाची तमा नव्हती. निर्भय बनून सगुणा रस्ता कापत होती. दिवसभर तिच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नव्हता. बाळाच्या काळजीने तिने दुपारचा डबाही खाल्ला नव्हता. मालकाकडून तिने थोडीशी उचल आणली होती. पण ते पैसे देताना मालकाने तिच्या चार पिढ्यांचा उद्धार केला होता पण आज सर्व ऐकून घेण्यावाचून तिच्याकडे ...