Tuesday, January 27

Gerenal

Gerenal

दातावर घाला दागिने..!

हल्ली कशाकशाची फॅशन निघेल हे सांगणे कठीन आहे. आता दाताचेच घ्याना. आजकाल दातांवर फॅशन म्हणून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. दात चांगले, चमकदार स्वच्छ दिसावे याकरीता दातांवर कव्हरींग करण्यासाठी जो धातू निवडता आहात, तशा पद्धतीने तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतात.आता जर कोणी हसल्यावर तुम्हाला त्याचे दात चमकताना दिसले, तर त्याचे दात किती स्वच्छ, चमकदार असं म्हणून आश्‍चर्यचकीत होऊ नका. कारण ही चमक त्याच्या दातांची नसून त्याच्या दातांवर बसविलेल्या दागिन्यांची असू शकते. हो.. हे खरं आहे. आता जसे तुम्ही कानात, गळ्यात, नाकात दागिने घालता ना, तसेच आता तुमच्या दातांवरही तुम्ही दागिने घालू शकता. दातांसाठी खूप वेगवेगळे दागिने असून या दागिन्यांची फॅशन करणार्‍यांचीही काही कमी नाही.१. दातांवर हिरे.. दातांवर हिरे लावण्याची फॅशन विदेशात अतिशय लोकप्रिय आहे. डेंटिस्ट आणि आर्टिस्ट या दोघांच्या मदतीने दा...
Gerenal

तापाची समस्या..!

ऋतूबदल तसंच अन्य कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तापाची समस्या निर्माण होते. यावर काही घरगुती उपचारांसोबत डॉक्टरांचा सल्लाही घेतला जातो. परंतु ताप हा आजार नसून आजाराचं लक्षण आहे हे समजून घ्यायला हवं. आजारावर इलाज झाल्याशिवाय ताप बरा होत नाही. त्यामुळेच अंगावर ताप काढण्याची सवय योग्य नाही.    नवजात बालकांच्या शरीराचं तापमान १00 डिग्रीपेक्षा जास्त आणि पाच ते सहा वयोगटातील मुलांच्या शरीराचं तापमान १0१ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर ताप आहे असं समजलं जातं. बरेचदा स्पर्शाच्या आधारे शरीराच्या वाढलेल्या तापमानाचा अंदाज घेऊन ताप आहे अथवा नाही हे ठरवलं जातं. पण ही चुकीची पद्धत आहे. ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचाच वापर करावा. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या काखेत तीन ते पाच मिनिटे थर्मामीटर ठेवून वाढलेल्या तापमानाची नोंद घ्यावी. पाच वर्षांपुढील मुलांच्या तोंडात थर्मामीटर ठेवून तापमानाची नोंद घ्यावी.   ताप आल्य...
Gerenal

गोल्ड फेशियलची चमक आता घरीच मिळवा.!

गोल्ड फेशियल करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे, असं काही नाही. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल, तर ३ गोष्टी वापरा आणि घरीच गोल्ड फेशियलची चमक मिळवा.फेशियल करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पर्ल फेशियल, गोल्ड फेशियल असे काही प्रकार एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी किंवा काही खास प्रसंगी केले जातात. फेशियलच्या इतर प्रकारांपेक्षा हे दोन प्रकार जरा जास्त महागडेही असतात. त्यातही पर्ल फेशियलपेक्षा गोल्ड फेशिअल करणे तर खूपच महाग जाते. म्हणून पार्लरमध्ये जाऊन गोल्ड फेशियल करण्यावर पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल आणि तेवढा वेळही नसेल, तर घरच्या घरी गोल्ड फेशियलचा लूक तुम्हाला निश्‍चितच मिळू शकतो.गोल्ड फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे केस पुर्णपणे मागे घ्या आणि बेल्टने बांधून टाका.यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.आता फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे चेहर्‍याचं क्लिंझिंग करणे.यासाठी तुमच्याकडे...
Gerenal

महिलांना फायब्रोमायल्जयाचा धोका

फायब्रोमायल्जया नावाचा एक विकार आहे. हा विकार पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक प्रमाणात होतो. ३0 ते ५0 या वयोगटातल्या महिलांना हा विकार जडण्याचा धोका बराच जास्त असतो. ब्रिटनमधल्या एका संशोधनानुसार २५ पैकी एक व्यक्तीला हा विकार होऊ शकतो. ब्रिटनमध्ये १५ ते २0 लाख लोकांना हा विकार झाल्याचं एका आकडेवारीवरून समोर आलं आहे. या विकाराविषयी जाणून घेऊ.    फायब्रोमायल्जया या विकारात स्नायूंमध्ये प्रचंड वेदना जाणवतात. या अस वेदनांमुळे माणूस अक्षरश कळवळतो. आपल्या मानसिक स्थितीवर याचा परिणाम होतो. या विकारामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. दुखापत, शस्त्रक्रिया, जंतूसंसर्ग आणि नैराश्यामुळेही ही व्याधी जडू शकते. या विकारात रुग्ण स्वत:वरचं नियंत्रण हरवून बसतो. त्यामुळे अत्यंत धोकादायक असा हा विकार आहे. ही व्याधी पूर्ण बरी होऊ शकत नसली तरी त्यावर औषधांद्वारे नियंत्रण मिळवता येतं.  ...
Gerenal

गरोदरपणात त्वचा जपा

गरोदरपणातले नऊ महिने हा महिलांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. आई होण्याचा आनंद अनुभवत असतानाच स्त्रियांना विविध शारीरिक बदलांनाही सामोरं जावं लागतं. गरोदरपणात शारीरिक बदल होतातच शिवाय महिलांच्या त्वचेवरही परिणाम होतो. जवळपास ९0 टक्के महिलांना बाळंतपणानंतर त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. नवा जीव जन्माला घालणं कोणत्याही महिलेसाठी सोपं नसतं. तिला बरीच भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतरं अनुभवावी लागतात. या काळात काही महिलांचं वजन वाढतं. काही गुंतागुंत निर्माण होते. त्यातही गरोदरपणात आणि त्यानंतर त्वचा तसंच केसांच्या संरचनेत बरेच बदल झाल्याचं दिसून येतं.बाळंतपणानंतर त्वचेचा पोत टिकवून ठेवणं खूप आव्हानात्मक असलं तरी हे बदल कायमस्वरुपी टिकणारे नसतात, ही त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल. थोडी काळजी आणि उपायांनी तुम्ही पुन्हा उजळ त्वचा प्राप्त करू शकता. गरोद...
Gerenal

लट्ठपणा कमी करण्यासाठी..

लट्ठपणा विविध व्याधींना निमंत्रण देतो. आयुर्वेदात स्थूलपणावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. संतुलत आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घातली तर आयुर्वेदिक उपायांनी बरेच लाभ होऊ शकतात.शरीरात आमामुळे स्थूलपणा वाढतो. चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि अन्नपचन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शरीरात आम या विषारी घटकाची निर्मिती होते. आमामुळे शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी आमाचं निर्मूलन करण्यावर आयुर्वेदाचा भर असतो. शरीरात आम असताना वजन कमी करणं जवळपास अशक्य होऊन बसतं, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच आहारावर नियंत्रण आणूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. त्यामुळे आमाचं प्रमाण कमी केल्यानंतरच वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी.काही आयुर्वेदिक औषधी आमावर प्रभावी ठरतात. त्यात हळद, त्रिकातू, दारूहळद (बार्बेरी), त्रिपबला आणि गुग्गुळ यांचा समावेश करावा लागे...
Gerenal

महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या.!

मुंबई : कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरीबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे. गरीबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मत: कुपोषणाची शिकार ठरणार्‍या बालकांचे प्रमाण मोठे आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन ही परिस्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या महाराष्ट्रात आहे.    एका वृत्तानुसार, माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात महिला आणि बालविकास कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ३३ लाखांहून अधिक कुपोषित बालकं असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुलं अतिकुपोषित आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असून, यात महाराष्ट्र ...
Gerenal

आमचं बडनेरा आमचं मालगुडी..!

काहींसाठी बडनेरा, काहींसाठी बीबीचं बन्नेरा तर कांहीसाठी नुसतं बडनेर.ते कांहीही असो पण बडनेराचं आपलं एक अस्तित्व आहे.ते अस्तित्व दुसर्या कुठल्या शहरामुळे नसून बडनेराची स्वतःची अशी एक ओळख म्हणून. श्रीराम जयराम जयजयराम अशी आरोळी उच्च आणि सुरेख स्वरात ऐकू आली तर आमच्या बडनेराचे सर्वांना परिचित आणि पूजनीय व्यक्तिमत्व गुरूवर्य श्री.शास्त्री महाराज आलेच म्हणून समजा.गावाला त्यांनी दिलेला गुरूमंत्र म्हणजेच श्री राम जय राम जयजयराम.त्यांच्या चरणांना व काठीला स्पर्श करण्यासाठी रस्त्यातला प्रत्येकजण उत्सुक असायचा व त्यांचा आशिर्वाद घेतल्यानंतरच पुढची दिनचर्या सुरू करायचा. आमच्या पाठीवर काठीने नाजूकशी टपली मारून ते शिष्यप्रेम acknowledge करायचे.बडनेराला बीबीचं बन्नेरा असंही नाव होतं.बीबी ची गढी आता जमीनदोस्त झालेली आहे आणि ती जुनी विरासत सुद्धा आता नाहीशी झालेली आहे.ईस.१७७२ मध्ये निजाम दौलत शाह बेगम ...
Gerenal

नेत्रदान…. काळाची गरज…!

नेत्रदान पंधरवडा विशेष लेखपरिवार व स्वास्थ कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे गेल्या 22 वर्षांपासून 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून राबविला जात आहे यानिमित्त हा विशेष लेख. भारतीय संस्कृतीत दानास खूप महत्व आहे. दानास अध्यात्माची, धर्माची, प्रतिष्ठेची जोड दिल्याने अन्नदान, गोदान, धनदान करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. अवयव रोपणाची कल्पना प्रत्यक्ष आणण्यास 16 व्या शतकात इ.स. 1668 मध्ये मिनरल या तज्ज्ञाने कुत्र्याच्या हाडाचे रोपण मानवाच्या कवटीवर केले होते. इ.स. 1900-1920 या काळात याबाबत भरपूर प्रयत्न झाले, यातूनच नेत्ररोपणाची अभिनव कल्पना जन्माला आली. इ.स. 1906 मध्ये मिर्झा या नेत्रतज्ज्ञाने नेत्ररोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली. मात्र यशस्वी नेत्रतज्ज्ञाने नेत्ररोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली. मात्र यशस्वी नेत्ररोपणाचे श्रेय डॉ. मॅक्स फाईन...
Gerenal

दुचाकी वाहनांचेच जास्त अपघात का..?

दुचाकी वाहनांपेक्षा इतर वाहने जास्त प्रमाणात रस्त्यावर धावत असताना दुचाकी वाहनांचे जास्त अपघात होण्याची कारणे खालील प्रमाणे असावीत.* कमी वयातील तरूण मुलांना दुचाकी परवाना दिला जातो,तर काहीकडे परवाना सुध्दा नसतो अशी मुले काॅलेजला जाताना व पिकनिकसाठी दुचाकी वाहनांचा शर्यतीची मजा म्हणून एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघाताला सामोरे जातात.शक्यतो 20 वर्ष वयातील व्यक्तिलाच परवाना देण्यात यावा व ओव्हरटेक करणार्याला कडक शिक्षा असावी.* दुचाकी वाहनावर बसण्यास दोन व्यक्तिंना परवानगी असताना फक्त एकाच व्यक्तिला हेल्मेटची सक्ती आहे,अपघाताच्या वेळी दुसर्याच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी वाहतूक प्राधिकरणाने(आर.टि.ओ) दोघांसाठीही हेल्मेट सक्तीची करावी.* पावसाळा सुरू झाला की रस्ता ओला होतो अशावेळी अचानक ब्रेक लावल्यास वाहन तात्काल रस्त्यावर आडवे होते,याचे...