Thursday, January 29

Gerenal

Gerenal

थंडीतही सुरू ठेवा व्यायाम.!

हुडहुडी भरवणार्‍या थंडीत सकाळी उठून व्यायाम करणं जीवावर येतं. अंगावरचं पांघरून बाजूला करावंसं वाटत नाही. पण तासभर झोपण्यासाठी आपण आपल्या आरोग्याकडे, फिटनेसकडे दुर्लक्ष करतो. एखाद्या दिवशी झोपणं ठीक आहे. पण दररोजचा आळस उपयोगाचा नाही. थंडीच्या दिवसातही स्वत:ला व्यायामासाठी कसं सज्ज करता येईल याबाबतच्या काही टिप्स.   थंडीत घराबाहेर पडायचं नसेल तर घरीच व्यायाम करा. योगा, जॉगिंग, डान्स असं काहीही करता येईल. घरच्या घरी करण्यासारखे साधेसोपे व्यायामप्रकार आहेत. हे व्यायाम करून तुम्ही फिट राहू शकता. ? दररोज एकाच प्रकारचा व्यायाम करून कंटाळा येतो. मग व्यायाम टाळला जातो. व्यायाम एकसुरी होत असेल तर डान्स, जीम, योगा, धावणं असं वैविध्य आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला दररोज व्यायाम करावासा वाटेल. व्यायाम करण्यामागची कारणं टिपून ठेवा. काही जण वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेससाठी व्यायाम करतात. आपल्या...
Gerenal

रागावर मिळवा नियंत्रण

रोजच्या आयुष्यात राग येणं अगदी स्वाभाविक आहे. पण रागावर नियंत्रण मिळवणंही तितकंच गरजेचं आहे. रागाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर नातेसंबंधांवरही होतो. त्यामुळे रागाचं व्यवस्थापन करण्याच्या या टिप्स तुमच्या कामी येतील.   तुम्हाला एका विशिष्ट परिस्थितीत राग येतो किंवा काही गोष्टी मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर चिडचिड होते. मात्र उगाचच रागविण्यापेक्षा किंवा चिडचिड करत बसण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधणं गरजेचं आहे. समस्या कितीही जटील असली तरी सुटू शकते. त्यामुळे समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.रागाच्या भरात आपण बरंच काही बोलून जातो. या शब्दांमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि नात्यांवर परिणाम होतो. त्यामुळे राग आल्यावर फार बोलू नका. शांत व्हा. राग कमी झाल्यावर स्वत:च्या भावनांना वाट करून द्या. शांतपणे चर्चा करा. आपली समस्या, प्रश्न किंवा व्यथा शांतपणो मांडा.   राग येण्यामागच्या कारणांचा श...
Gerenal

मद्यपान करताय?

मद्यपान करणं हा आजकाल ट्रेंड बनत आहे. पण कधीतरी केलेलं मद्यपान सवय कधी बनते हे समजतही नाही. मद्यपान सोडल्यानंतर कोणते सकारात्मक बदल होतात याविषयी जाणून घेतलं तर ही घातक सवय सोडणं सोपं जाईल.सततच्या मद्यपानामुळे शरीरात पाणी आणि अतिरिक्त फॅट्स जमा होतात. दारू सोडल्यानंतर साधारण दोन आठवड्यात फॅट्सचं प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. मद्य सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे शरीरात विषारी द्रव्यं जमा होतात. पणं सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये याचं प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत कमी होतं. झोप न येणं, ताणतणाव अशा समस्या मद्यपानामुळे निर्माण होतात. दारू सोडल्यानंतर या समस्या सुटू शकतात.दारूमुळे तोंड, यकृत आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. दारू सोडल्यास ही शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. मद्...
Gerenal

किफायतशीर दरांमुळे घरखरेदी आली आवाक्यात

कोरोना विषाणूची कमी होत जाणारी तीव्रता आणि अर्थव्यवस्थेची रूळावर येणारी गाडी यामुळे ग्राहकांनी घरखरेदीच्या योजना पुढे ढकलू नयेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं असून सध्याचा काळ मालमत्ता खरेदीसाठी अगदी योग्य असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.   बांधकाम व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या योजना आणि विविध राज्यांच्या सरकारांनी दिलेल्या सवलती यामुळे गेल्या वर्षीचा सणासुदीचा काळ घरखरेदीसाठी उत्तम मानला जात होता. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे खरेदीदारांनी आपल्या योजना पुढे ढकलल्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचं सावट चांगलंच कमी होत आहे. अर्थव्यवस्थेलाही गती मिळू लागली आहे. त्यामुळे आता घरखरेदी लांबणीवर टाकण्यात काहीच अर्थ नसल्याचं मालमत्ता क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत. अनेक कारणांमुळे सध्याच्या काळात घरखरेदीचा निर्णय योग्य ठरू शकतो.   किफायतशीर दरात उपलब्ध असणारी घरं हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणत...
Gerenal

छंदांना व्यवसायाची जोड..!

अनेक महिलांमध्ये उपजत कला-गुण आढळतात. अनेक महिलांना चित्रकला, हस्तकला, मूर्तीकला आवडते. डिझायनिंग, अँनिमेशन, गेमिंगमध्येही त्यांना रस असतो. पण या छंदांना, कलागुणांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून वाव देता येतो. हे अभ्यासक्रम पूर्ण करून छंद, आवडींना व्यवसायाची जोड देऊ शकता.   चित्रकला, हस्तकला, डिझायनिंगसारख्या कलांना फाईन आर्टस म्हटलं जातं. यात बॅचलर, मास्टर्स किंवा पीएचडी करता येते. सोबत वर्षभराचे डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बॅचलर इन फाईन आर्टस साठी चार वषर्ं द्यावी लागतात. दोन वर्षाचा मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फाईन आर्टसमध्ये पीएचडी करता येते. दूरस्थ शिक्षण पद्धतीनेही फाईन आर्टची पदवी मिळवता येते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक संधी प्राप्त होतात. इतर क्षेत्रांमध्ये नोकरी करणार्‍या महिला फ्री लान्सर म्हणून काम करू शकतात.     आपल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवू शकतात. जा...
Gerenal

हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी

ऋतू बदलला की त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलावी. थंडीत त्वचा कोरडी पडते, रॅश येतात. त्यामुळे काही उपाययोजना कराव्या.थंडीत त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. या टॅनिंगपासून वाचण्यासाठी त्वचेला योग्य एसपीएफ असणारं सनस्क्रिन लावावं. दिवसा घराबाहेर पडण्याआधी २0 मिनिटे सनस्क्रिन चेहर्‍यावर लावा. त्वचेचा ओलावा कायम राखणारं मॉश्‍चरायझिंग फेसवॉश वापरणं इज मस्ट. बाजारात अनेक मॉश्‍चरायझिंग फेस वॉश आहेत. या फेसवॉशमुळे चेहरा धुतल्यानंतरही कोरडा पडत नाही. चेहरा मऊ रहायला मदत होते. हा फेसवॉश तुमच्या त्वचेला पोषण देतो.तुम्ही दिवसा घराबाहेर पडणार नसाल तर चेहर्‍याला हलकं मॉश्‍चरायझर लावा. यामुळे त्वचेतला ओलावा कायम राहील. मॉश्‍चरायझर हलकं नसेल तर तुमची त्वचा तेलकट दिसेल याची दखल घ्या. दिवसा कोरफड किंवा गुलाबमिश्रीत मॉश्‍चरायझरचा वापरही योग्य ठरेल. या काळात ओठ कोरडे पडतात. त्यामुळे आपल्या जवळ कायम लिपबाम ...
Gerenal

फिट आल्यानंतर काय करावे?

एपिलेप्सी हा एक मेंदूसंदर्भातील आजार आहे. फिट येणे, आकडी, मिरगी आदी नावांनी एपिलेप्सी हा आजार ओळखला जातो. फिट्स येणे ही एकप्रकारे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य तरंग निर्माण होऊ लागतात. यात रुग्णाला झटके येतात, तो जमिनीवर पडतो आणि काही वेळासाठी तो बेशुद्ध होतो. सुमारे १0 व्यक्तींपैकी एकाला फिट्स येण्याचा त्रास असतो. फिट्स येण्याची समस्या अनुवांशिकही असू शकते, याशिवाय मेंदूचा संसर्ग, डोकेदुखी, स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमरही याला कारणीभूत आहे. विशेषत: मेंदूतील रासायनिक आणि विद्यूत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. मेंदूमध्ये छोट्या पेशीमध्ये इलेक्ट्रीक प्रक्रिया होत असतात. यातील काही पेशी दुसर्‍या पेशींना उत्तेजित करतात. अशा स्थितीत इनहिबिटर पेशी रोखल्या जातात. या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्याने संतुलन बिघडते आणि फिट्स येण्याचा...
Gerenal

मासिक पाळीतील अनियमितता

महिलांसाठी मासिक पाळी नियमित ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जर हे नियमित नसेल तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. तसे मासिक पाळी २-४ दिवस मागेपुढे होणे सामान्य आहे. काही स्त्रियांमध्ये पाळीचा काळ निश्‍चित नसतो. जर त्यांची मासिक पाळी एका विशिष्ट वेळेत न येता खूप कालांतराने येत असेल तर या मागे अनेक कारणे असू शकतात.अनियमित दिनक्रम आणि चुकीचा आहार : मासिक पाळीचे चक्र बदलण्याचे सर्वात मोठे कारण अनियमित जीवनशैली आहे. सुस्त जीवनशैलीमुळे शरीराच्या संप्रेरकांवर देखील परिणाम होतो. अनियमित दिनक्रमांमध्ये व्यायाम न करणे, वेळेवर झोप न घेणे, वेळेवर न खाणे इत्यादींचा समावेश आहे.उच्च तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे देखील मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त म्हातारपणाचा किंवा तरुणपणाचा परिणामही मासिक पाळीवर दिसून येतो. ज्या स्त्रियांचे वय ४0 पेक्षा जास्त आहे त्यांना रजोनवृत्ती पूर्वी मासिक पाळीमध्य...
Gerenal

वन बेडरूम फलाट

गनपत वन बेडरूम फलाट मंदी बायको,पोरासंग राहत व्हता. मस्त खुसीची जीदगानी जगत व्हता.पोराले उच्च शिक्षन देल्लं. गनपत शायेत चपराशी व्हता. ईमानदारीन नोकरी करे कोनाच्या घेन्यात ना देन्यात. पोरगं मोठ झालं थो लय मोठे मोठे सपन पाये. त्याले वाटे कां येथं काई ठिवलं नाईपरदेशात जाऊन नोकरी कराची, अन पैसा कमवाचा थेच त्याच्या डोक्सात भरलं. दोन तीन वर्ष त्यान नोकरी करुन पैसा जमवला. अन् मंग परदेशी जाचं ठरुलं. माय बाप सांगू सांगू थकले. पन नाई मले जाच मनजे जाचच. तुमी राहा इथंच वन बेडरूम फलाट मंदी. बाप मने अबे लेका तू येथच लायनाचा मोठा झाला. शिक्षन, खानपान सारं इथंच झालं अन या जनम भूमी ह्यो भारत देश सोडून चालला. तुले कंटाया आला...माय बापाचे डोये भरुन आले..जाय तुले कोठं जाचं हाय तेथं..आखीर पोरगं माय बापाचा निरोप घिवून परदेशी निंगून गेला....!!माय बाप डोक्सावर हात ठेवून मुसुमुसू रडू लागला..पोरगं परदेशात गेलं य...
Gerenal

हटके दिसायचे तर..!

आता लवकरच लग्नसराई सुरू होत आहे. त्यादृष्टीने लग्न समारंभात हटके पोषाखाच्या ानवडीबाबत विचार करायला हवा. खरं तर नेहमीच्या जीन्स-टी शर्ट, फॉर्मल्सपेक्षा काही तरी वेगळं ट्राय करायची संधी या निमित्ताने मिळत असते. त्यादृष्टीने तुम्ही बंदगळा हा प्रकार ट्राय करू शकता. हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा कॅरी करायचा याविषयी..थोडा मोकळाढाकळा लूक हवा असेल तर फिटिंगवाल्या ट्राउर्जससोबत बंदगळा कॅरी करा. त्यावर डबल माँक ट्रॅप्स ट्राय करता येतील. हँडवर्कवाला बंदगळा ट्राय करता येईल. ब्लॅक किंवा इतर मॅचिंग ट्राउर्जससोबत तो कॅरी करा.सोबत लेदरचे शूज आहेतच. प्लेन कुर्ता पायजमा आणि त्यावर बंदगळा नेहरू ज्ॉकेट असं कॉम्बिनेशन करता येईल. यासोबत माँक स्ट्रॅप्स किंवा मोजडी ट्राय करता येईल. सकाळच्या वेळी गॉगलही घालता येईल. अगदी लांब आकाराचा बंदगळा कॅरी करण्यापेक्षा थोडा शॉर्ट बंदगळा घ्या. सोबत योग्य फिटिंगची जोधपुरी पँट ...