Sunday, February 1

Gerenal

Gerenal

केसांची वैविध्यपूर्ण रचना…

केसांची वैविध्यपूर्ण रचना तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच खुमारी देऊन जाते. लूज वेव्ह्ज ठेवल्या तर क्लासी आणि एलिंगट लूक मिळतो. मुख्य म्हणजे यासाठी पार्लरची वारी करायला हवी असं नाही.घरच्या घरी कर्लिंग आयरनच्या मदतीने तुम्ही हा लूक मिळवू शकता. बीची वेव्ह्ज, लूज कर्ल्स हा चलतीत ट्रेंडही तुम्ही फॉलो करु शकता. हा वेवी लूक केसांच्या निम्म्या भागापासून सुरू होतो. पोनीटेल घालून केसांचा खालचा भाग कर्ल करुन तुम्ही हा लूक मिळवू शकता. यासाठी हेअर ड्रायर, पॅडल ब्रश, थर्मल प्रोटेक्टंग हेअर स्प्रे, कर्लंग आयरन, हेअर पिन्स आणि क्लप्सची गरज भासेल. हा लूक मिळविण्यासाठी सर्वप्रथम ब्लो ड्राय करा. ब्लो ड्राय करताना पॅडल ब्रशचा वापर करा.यामुळे केस मुलायम व चमकदार होण्यास मदत होईल. त्यानंतर कर्लिंग आयरनच्या मदतीने वेव्ह्ज बनवा. आजूबाजूचे केस ब्लो ड्राय करा. यामुळे कर्ली लूक मिळेल. कर्ल्स बराच काळ टिकून रहाव...
Gerenal

तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••

  बायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••• नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••• बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात, तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••   मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते, तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••• "लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••• ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••• ख...
Gerenal

पर्यावरण पत्र लेखन

प्रिय पर्यावरण, सप्रेम नमस्कार वि.वि. आज रविवार ५ जूनला तुझा जागतिक पर्यावरण दिवस असून धुमधडाक्यात साजरा होत आहे. हो करायलाच हवा म्हणा. आमच्या सर्वांचे जीवन तर तुझ्यावरच अवलंबून आहे. आम्हा साऱ्या सजीवांना आमच्या जीवन संघर्षासाठी आणि आमच्या उत्क्रांतीसाठी तुझ्याशी जुळवून घ्यावे लागते अथवा त्या करता अनुकूल असे बदल घडवून आणावे लागतात. जे तुझ्याशी जुळवून घेत नाहीत ते नष्ट होतात. जो कोणी बदल स्वीकारतो तोच तग धरून राहू शकतो.    तुझे आणि आम्हा मानवाचे परस्पर संबध नेहमी बदलत असतात. तुझे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे आणि ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पर्यावरण हा एक प्रकारचा भौगोलिक वाद आहे त्या द्वारे बाह्य परिसरामुळे आम्हा मानवांची जीवन पध्द्ती कशी निश्चीत होईल हे स्पष्ट केले जाते. पण आज मानव स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्याशी नीट वागत नाही. त्याच्या वेगवेगळ्या प्रकल्पामुळे तुझी दमछाक होते आणि नैसर्...
Gerenal

स्थूलपणा कमी करण्यासाठी..

लट्ठपणा विविध व्याधींना निमंत्रण देतो. आयुर्वेदात स्थूलपणावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. संतुलत आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घातली तर आयुर्वेदिक उपायांनी बरेच लाभ होऊ शकतात. शरीरात आमामुळे स्थूलपणा वाढतो. चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि अन्नपचन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शरीरात आम या विषारी घटकाची निर्मिती होते. आमामुळे शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी आमाचं निर्मूलन करण्यावर आयुर्वेदाचा भर असतो. शरीरात आम असताना वजन कमी करणं जवळपास अशक्य होऊन बसतं, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच आहारावर नियंत्रण आणूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. त्यामुळे आमाचं प्रमाण कमी केल्यानंतरच वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी.   काही आयुर्वेदिक औषधी आमावर प्रभावी ठरतात. त्यात हळद, त्रिकातू, दारूहळद (बार्बेरी), त्रिपबला आणि गुग्गुळ यांचा समावेश करावा लागे...
Gerenal

तीळगुळ घ्या आणि चांगले बोला

मकरसंक्रांत दरवर्षी येते.आनंद घेवुन.तीळगुळ देवुन तीळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत आपण तिचं स्वागत करीत असतो.नव्हे तर हा आनंदाचा पर्वही साजरा करीत असतो.पण काही उचाट मंडळी या तीळसंक्रातीला गालबोट लावुन तीळसंक्रात फलाण्या गोष्टीवर आली असे उगाच बडबडत असतात. तीळसंक्रात आनंदाचा पर्व आहे.या दिवशी लोक आपल्या अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करीत असतात.तसेच जेवणासाठी जे ही पदार्थ बनवतात.त्या सर्व पदार्थात तीळ टाकतात.याचा अर्थ असा आहे की या तीळ टाकल्याने रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच.शिवाय तीळामुळे शरीरातील थंडीने निर्माण झालेली उर्जा भरुन निघते.मृत्यु हे आपल्या जीवनातील अंतिम सत्य आहे.या मृत्युने प्राणीपक्षी,व वृक्षलता यांनाही सोडलेले नाही.जर माणुस मेलाच नाही तर नवीन जीव जन्माला कसा येणार? मग तो तीळसंक्रातीचा दिवस का असेना......माणसाने गावात सकाळी एखादा जीव मेलेला पाहिला रे पाहिला की ...
Gerenal

दातांवर डाग पडताहेत?

पांढरेशुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात, काळपट दिसू लागतात. यामुळे आपण फार अस्वस्थ होतो. योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर परिणाम होऊ लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असं होऊ शकतं. अनेक कारणांमुळे दात पिवळे पडतात. अशाच काही कारणांविषयी जाणून घेऊन आपण दातांचं आरोग्य टिकवून ठेऊ शकतो.सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे दातांच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होतो. या पदार्थांमुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.तोंड आणि दातांशी संबंधित विकारांमुळे आणि त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्‍या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो. रेडिएशन, केमोसारख्या उपचारांमुळे दातांच्या रंगावर परिणाम होतो. दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दातांची, तोंडाची योग्य ती काळजी घ्या...
Gerenal

उपयुक्त ऑटो रिप्लाय अँप्स

मैत्रिणींनो, तुमच्यापैकी कोणी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असेल तर ते धोक्याचं ठरू शकतं. फोन कॉल किंवा मेसेजला उत्तर देताना लक्ष विचलित झाल्याने अपघात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत वाहन चालवत असाल तर काही ऑटो रिप्लाय अँप्स कामी येतील. त्याविषयी जाणून घेऊ..'गुगलच्या 'अँड्रॉइड ऑटो अँप'मध्ये 'ऑटो रिस्पाँड' फिचर आहे. यात अँपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'ऑटो रिप्लाय' विभागात संदेश लिहायचा. मेसेज आल्यावर फक्त रिप्लायवर टॅप करायचं. तुम्ही ड्रायव्हिंग करत असल्याचं कळेल.'ऑटो रिप्लाय टेक्स्ट मेसेज' अँप डाउनलोड केल्यानंतर ड्रायव्हिंग करताना आलेल्या कॉल किंवा एसएमएसला ऑटो रिप्लाय करता येईल. यात कॉन्टॅक्ट लिस्ट करावी. मेसेज आल्यावर 'रिप्लाय' ऑप्शनवर टॅप केल्यावर समोरच्याला संदेश मिळेल.'ऑटो एसएमएस लाईट'मुळे आलेले एसएमएस तसंच मिस कॉल्सना ऑटो रिप्लाय पाठवता येईल. गाडी चालवताना '...
Gerenal

सूर्यनमस्कार का घालावेत?

आपल्या पोटात जठर, यकृत, प्लहा, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे. निसर्गाने एवढय़ाशा जागेत एवढे अवयव आणि २२ फूटाचे आतडे कसे बसवले असेल? अन्नाचा घास येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो आणि घास पुढे गेला की ते पुन्हा अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवश्यक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.सूर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा...
Gerenal

हृदयविकाराबाबत जाणून घ्या

हल्ली हृदयविकाराचं प्रमाणही वाढू लागलं आहे. त्यादृष्टीने काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आपल्या हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांची अहोरात्र गरज असते. या पेशींमध्ये रक्तप्रवाह सुरू ठेवण्याचं काम तीन धमन्या करतात. यापैक दोन धमन्या हृदयाच्या डाव्या बाजूला असतात. त्यातील प्रमुख धमनी पुढच्या भागात असते. हृदयविकाराच्या एकूण झटक्यांपैकी ६0 ते ७0 टक्के झटके हे पुढच्या धमनीतल्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने येतात.    बैठी जीवनशैली, तेलकट, गोड पदार्थांचं सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. हे कोलेस्टेरॉल धमन्यांच्या भिंतींमध्ये साठू लागतं. यामुळे धमन्यांच्या भिंतींची लवचिकता निघून जाते. या भिंतींवर प्लेटलेट्स साठायला सुरूवात होते. त्यामुळे धमन्यांच्या छिद्रांचा आकार लहान होत जातो आणि अखेर ही छिद्रं बंद होतात. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने रक्तप...
Gerenal

थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी..!

अनेकांना हायपोथायरॉईडझमचा त्रास असतो. भारतात दहा पैकी एका व्यक्तीला या विकाराने ग्रासले आहे. निरोगी जगण्यासाठी थायरॉईड नियंत्रणात असणे गरजेचे असते. हार्मोन्सचे असंतुलन हे थायरॉईडचे मूळ कारण आहे. आहारातल्या काही बदलांमुळे थायरॉईड नियंत्रणात ठेवता येतो.अँव्होकॅडो हे विविध पोषक घटकांनी समृद्ध फळ आहे. यात पोटॅशियम तसेच इतर काही पोषक घटक असतात. यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात रहायला मदत होते. तसेच हार्मोन्सचे संतुलन साधले जाते. यामुळे थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत सुरू रहायला मदत होते.हिरव्या पालेभाज्यांमधल्या पोषक घटकांमुळेही हार्मोन्सचे संतुलन साधले जाते. त्यामुळे आहारात अशा भाज्यांचा समावेश करायला हवा. विविध प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अँसिड्स असतात. या पोषक घटकामुळे शरीराचा दाह कमी होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढते तसेच हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी होतो. थायरॉईड ग्रंथीं...