प्राधान्यक्रम महिला व बालकांच्याविकासाला…
- ॲड. यशोमती ठाकूर,
मंत्री, महिला व बालविकासमहाराष्ट्राने सामाजिक, आर्थिक, राजकीय आदी क्षेत्रातील सुधारणांद्वारे देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या विभागाची मंत्री म्हणून पदभार घेतानाच महिला आणि बालकांचा विकास हा विषय जिल्हास्तरावरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक विभागाच्या प्राधान्यक्रमावर आणणे हे उद्दीष्ट मी बाळगले आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध कामही सुरू आहे. ‘सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र’ या संकल्पाच्या पूर्तीसाठी राज्यातील सर्वच घटकांच्या सहकार्याने राज्य शासन म्हणून आम्ही ठळक असे काम निश्चितच करुन दाखवू.
कोविडच्या रुपाने एक मोठे संकट आपल्या समोर उभे असताना आपण सर्वचजण त्याला धैर्याने तोंड देत आहोत. राज्य शासनाने या कालावधीत जनतेचीआरोग्य सुरक्षा तसेच विविध समाजघटकांना दिलासा देण्याच्यादृष्टीनेवेळोवेळी आढावा घेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्य...