
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. हा विजय ऐतिहासिक ठरला असला तरी सामन्यानंतरचा प्रसंग अधिक गाजला. कारण भारतीय संघाने विजेत्यांची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
प्रेमदासा स्टेडियमवर सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ जवळपास तासभर उशिरा सुरू झाला. या विलंबामुळे मैदानावर गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते द्यायची होती. नक्वी हे भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जात असल्याने भारतीय संघाने सामूहिकरित्या व्यासपीठावर जाण्यास नकार दिला.
सूत्रसंचालक सायमन डुल यांनी समारंभ थांबवताना जाहीर केले की, “भारतीय संघ आज रात्री पारितोषिकं स्वीकारणार नाही.” परिणामी संघाचा सामूहिक फोटो घेण्यात आला नाही. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी वैयक्तिक पुरस्कार स्वीकारले. तर कर्णधार सूर्यकुमार यादव याची पारंपरिक विजयानंतरची मुलाखतही झाली नाही.
पाकिस्तान संघही ड्रेसिंग रूममधून उशिरा मैदानावर आला. त्या वेळी संपूर्ण स्टेडियम “इंडिया… इंडिया…”च्या घोषणांनी दणाणून गेले. भारताने पाकिस्तानवर मात करून नववं विजेतेपद पटकावलं, मात्र ट्रॉफी न स्वीकारता एक ठाम भूमिका घेतली. या निर्णयामुळे भारतीय संघाचा विजय फक्त मैदानापुरता मर्यादित न राहता जगभरात चर्चेचा विषय ठरला.
भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार