- वंदन करितो भाऊसाहेबांना//
- नमन माझे तव चरणांना //धृ//
- तिमिरात बघा सूर्य उगवला//
- विद्यारुपी गंगेचा उगम झाला//
- झोपडितला या तम उजाळला//
- आचरण करु या तव तत्वांना//१//
- दशदिशा या करुनी तेजोमय//
- सत्कर्मांनी दिशा या गंधमय//
- जीवन जगले भाऊ कष्टमय//
- भाऊंनी दिली दिशा हीनदीनांना//२//
- भाऊसाहेबांची गाऊ आज कीर्ती//
- अजरामजर झाली प्रेरक मूर्ती//
- जगण्याची दिली बहुजना स्फूर्ती//
- स्मरतो आज या भाऊंच्या स्मृतींना//३//v
- प्रा. अरुण बा.बुंदेले
- अमरावती
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
- email:- arunbundele1@gmail.com