मित्रांनो, ऑफिसमध्ये कोणतेही कपडे विशेष करून कॅज्युअल वेअर ऑफिसमध्ये घालून जाणं चांगलं नाही. ऑफिसमधले फॅशनिस्टा बनताना या चुका तर करत नाही ना, जाणून घ्या..
एखाद्या कॉन्सर्टला गेला आहात. तिथे टी शर्ट किंवा जर्सी मिळाली. हा टी शर्ट किंवा जर्सी दुसर्या कॉन्सर्टला घालून जाऊ नका. ऑफिसमध्येही असा टी शर्ट घालू नका.ऑफिसमध्ये रिप्ड म्हणजे फाटलेली जीन्स घालून जाऊ नका. ही जीन्स कितीही कूल वाटत असली तरी घालण्याचा मोह टाळा. दाढी वाढवून विस्कटलेले केस घेऊन ऑफिसमध्ये जाऊ नका. ऑफिसमध्ये क्लिन शेव्हड लूकच कॅरी करा.
ऑफिसमध्ये शॉर्टस घालू नका. घरी किंवा बाहेरही शॉर्टस घालून फरत असलात तरी ऑफिसमध्ये शॉर्टस अजिबात घालू नका. क्रिकेट खेळताना किंवा कॅज्युअल आउटिंगला कॅप्स चांगल्या दिसतात पण ऑफिसमध्ये हा लूक चांगला दिसत नाही. त्यामुळे कॅप कितीही फंक असली तरी ऑफिसमध्ये घालू नका.
ऑफिसमध्ये घातल्या जाणार्या कपड्यांना नेहमी इस्त्री करा. कपड्यांच्या दोनच जोड्या असल्या तरी हरकत नाही. पण ते स्वच्छ, टापटिप असणं गरजेचं आहे.
📺 Gaurav Prakashan News YouTube
ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.
🔴 Subscribe Nowधन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.
Bandukumar Dhawane
बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.













