📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

शारीरिक अस्वास्थ्याचं कारण जाणून घेण्यासाठी इसीजी …

On: September 23, 2025 5:44 PM
आम्हाला फॉलो करा:
ECG

शारीरिक अस्वास्थ्याचं कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात. इसीजी ही अशीच एक तपासणी आहे. ताल नियमित आणि योग्य असेपर्यंत एखाद्या पंपासारखं काम करत शुद्ध रक्त शरीरभर खेळवत प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाकडून इमानेइतबारे पार पाडलं जातं. त्यासाठी हृदयाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात. या क्रियेत हृदय डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यातील रक्त जोराने बाहेर फेकत राहतं. यावेळी काही विद्युतसंदेश महत्त्वाची भूमिका बजावतात.

हृदयाच्या प्रत्येक ठोक्यागणिक एक विजेचा लोळ वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे पसरतो. या विद्युतस्पंदाचा आलेख म्हणजे ईसीजी. या आलेखावरून हृदयाच्या निरनिराळ्या भागातल्या विद्युतस्पंदाच्या स्थितीविषयीची बित्तंबातमी मिळते. थोडक्यात ईसीजी ही हृदयाच्या आरोग्याची माहिती देणारी एक साधी, निर्धोक आणि वेदनारहित निदान पद्धती आहे. हा आलेख मिळवण्यासाठी हृदयाच्या बारा निरनिराळ्या बिंदूंच्या ठिकाणी असणार्‍या विद्युतस्पंदांची माहिती मिळते.

त्यासाठी बारा निरनिराळे इलेक्ट्रोड या बिंदुंकडून नियंत्रित केल्या जाणार्‍या शरीराच्या निरनिराळ्या भागातील रक्तवाहिन्यांना जोडले जातात. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यागणिक या बिंदूंवरील विद्युतस्पंदांच्या स्थितीची माहिती गोळा केली जाते. हे दाखवणारा ईसीजी आपल्यासमोर हृदयाची नेमक स्थिती मांडतो.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment