
आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्ड
नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी नवे Aadhaar App लाँच केले आहे. या अॅपमुळे आता आधार कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही. एकाच मोबाईलमध्ये कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड ठेवता येतात. मात्र यासाठी सर्व सदस्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक एकच असणे आवश्यक आहे.
या अॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक आणि QR कोड शेअरिंग यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आहेत. त्यामुळे आधार डेटा अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपा झाला आहे. QR कोड स्कॅन करून बँक, कार्यालये किंवा अन्य ठिकाणी तत्काळ पडताळणी करता येते.
UIDAI च्या या अॅपमुळे इंटरनेट नसतानाही सेव्ह केलेले आधार पाहता येतात. तसेच ‘ॲक्टिव्हिटी लॉग’मुळे आपला आधार कधी, कुठे वापरला गेला याची संपूर्ण माहिती मिळते.
अॅप डाउनलोड करण्याची पद्धत:
1️⃣ Google Play Store किंवा Apple App Store वर ‘Aadhaar App’ शोधून डाउनलोड करा.
2️⃣ भाषा निवडा आणि १२ अंकी आधार क्रमांक टाका.
3️⃣ नोंदणीकृत मोबाइलवर आलेला OTP टाकून पडताळणी करा.
4️⃣ फेस ऑथेंटिकेशन करून सुरक्षा पिन सेट करा.
UIDAI चे हे अॅप पूर्णपणे विनामूल्य असून, देशातील १४० कोटींपेक्षा अधिक नागरिकांसाठी डिजिटल आधार व्यवस्थापनाचा हा सर्वात सुरक्षित आणि सोयीचा मार्ग ठरणार आहे.
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य