
११ हजार वोल्ट पडला, पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण
हिरो बनण्यासाठी ना सिक्सपॅक लागतं, ना चित्रपटात अॅक्शन सीन! बिहारच्या किशनगंजमध्ये केवळ ३ वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या आईसाठी असं धाडस दाखवलं की, देशभरातील नेटकरी थक्क झाले आहेत. एका महिलेला रस्त्याच्या कडेला उभं असताना तब्बल ११ हजार वोल्टेज विजेची तार अंगावर पडली. क्षणभरातच तिचं आयुष्य संपणार असताना तिचा छोटा मुलगा देवदूतासारखा धावला आणि आईला विजेपासून दूर खेचलं. त्या एका क्षणात आईचे प्राण वाचले आणि सगळे अवाक् झाले!
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ @Mahamud313 या एक्स (X.com) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, कॅप्शननुसार ही घटना किशनगंज, बिहार येथे घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला रस्त्याच्या कडेला उभी असते आणि अचानक विजेची तार तिच्यावर कोसळते. ती तार ११ हजार वोल्टेजची असल्याचं सांगितलं जातं. इतकं प्रचंड करंट शरीरातून गेलं असतं तर तिचा जागीच मृत्यू झाला असता. पण त्या लहान मुलानं क्षणार्धात परिस्थिती ओळखून आईला दूर खेचलं.
नेटकरी या व्हिडिओवर भावनिक प्रतिक्रिया देत म्हणत आहेत. “हा तर खरा हिरो आहे!” अनेकांनी त्या चिमुकल्याचं कौतुक करत त्याला ‘लहान सुपरहिरो’, ‘देवदूत’ अशी पदवी दिली आहे.
सामान्यपणे घरात वापरली जाणारी वीज २२० ते २४० वोल्ट इतकी असते, पण इथे होती तब्बल ११ हजार वोल्टची वीज! एवढा करंट अंगावर पडला असता तर शरीर राख झालं असतं. मात्र या चिमुकल्याचं प्रेम, जागरूकता आणि धाडस विजेपेक्षाही जास्त शक्तिशाली ठरलं.हा व्हिडिओ पाहून देशभरातील लोक या मुलाच्या धाडसाला सलाम करत आहेत. खरंच, वीज पडली… पण प्रेमाचा करंट भारी ठरला!
अंगावर पडली ११ हजार वॉल्ट वीज…..