
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यास आपण मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची बातमी ही धांदात खोटी असून आपण निमंत्रण स्वीकारलेलेच नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्पष्ट केले आहे. कमलताई गवई यांनी समाजमाध्यमावर स्वहस्ताक्षरी पत्र प्रसारित करत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक आहे. मला विश्वासात न घेता वा लेखी संमती न घेता अशा बातम्या प्रसारित करणे हे RSS चे षड्यंत्र आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले.
पत्रातील ठळक मुद्दे
- आरएसएसच्या अमरावतीतील विजयादशमी सोहळ्यास मी जाणार नाही.
- ही बातमी पूर्णतः खोटी असून अपप्रचार आहे.
- दादासाहेब गवई चॅरिटी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझे घराणे आंबेडकरी विचाराशी निष्ठावान आहे.
- आमच्यासाठी विजयादशमीपेक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिन अधिक महत्त्वाचा आहे.
- महाराष्ट्रासह देशातील जनतेने या अफवेला बळी पडू नये.
- धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे शुभेच्छा.
वादाची पार्श्वभूमी
५ ऑक्टोबरला अमरावतीतील श्रीमती नरसम्मा हिरेय्या महाविद्यालयाच्या प्रांगणावर संघाचा विजयादशमी सोहळा होत आहे. या कार्यक्रमात कमलताई गवई मुख्य अतिथी म्हणून येणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली होती. मात्र आता त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर चर्चांना वेगळे वळण लागले आहे.कमलताई गवई या राज्यपाल दिवंगत रासू गवई यांच्या पत्नी आहेत. रासू गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी चे अध्यक्ष होते. त्यांच्या योगदानामुळे दीक्षाभूमी उभारणीस गती मिळाली. त्यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र गवई हे देखील या समितीचे सदस्य आहेत.
—————————————–
—————————————–
मी आंबेडकरी, ‘आरएसएस’च्या विजयादशमी सोहळ्याला उपस्थित ..
—————————————–