
अभंग
वीटेवरी उभा, फक्त उगामुगा
कां असा कोडगा, पांडूरंगा?
निसर्गाचा कोप, लागेना गा झोप
सदा रीपरीप, जीवघेणी
जिथे तिथे पूर, हरवले सूर
भरले संसार, धारातीर्थी
पीकेही उध्वस्त, गेली घरेदारे
उरलेले सारे, भांबावले
उसवलं सारं, लागेना ठिगळ
आमुची आबाळ, आम्हा ठावे
आषाढी कार्तिकी, कासयासि यावे
उगीच कां गावे, नाम तुझे
सोड आता वीट, कर काहीतरी
नावाचाच हरी, नको होवू
-आबासाहेब कडू
—————————-
—————————-
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

—————————-
—————————-