अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध

अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध

अल्मोन स्ट्रॉजरची प्रेरणादायी कहाणी

1889 मध्ये अमेरिकेतील Kansas City येथे घडलेली एक घटना आज जगाच्या टेलिफोन उद्योगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. साधा Undertaker असलेल्या अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) याने व्यावसायिक स्पर्धेतून प्रेरणा घेऊन Automatic Telephone Exchange आणि Rotary Dial Phone चा शोध लावला.

स्पर्धकाची पत्नी बनली अडथळा

त्या काळी Kansas City मध्ये फक्त दोन Undertaker होते. तरीदेखील सर्व ग्राहक दुसऱ्याकडेच जात होते.
एका दिवशी स्ट्रॉजरच्या मित्राने त्याला सांगितलं –“मी तुला कॉल केला होता, पण टेलिफोन एक्सचेंजवरच्या महिलेने सांगितलं की तुझा फोन व्यस्त आहे. मग तिने मला थेट दुसऱ्या Undertaker कडे जोडून दिलं.”

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं – एक्सचेंजवर काम करणारी बाई ही त्याच्या स्पर्धकाचीच पत्नी होती! ती जाणीवपूर्वक सर्व कॉल्स आपल्या पतीकडे वळवत होती.

संकटातून जन्माला आलेलं नवसंशोधन

या अन्यायामुळे कुणीही तक्रार केली असती. पण स्ट्रॉजरने उपाय शोधण्याचा मार्ग निवडला. त्याने ठरवलं की आता कॉल जोडण्यासाठी टेलिफोन ऑपरेटरची गरजच उरणार नाही. इथून जन्म झाला Automatic Telephone Exchange या क्रांतिकारी शोधाचा.

21

Rotary Dial Phone चा जन्म

त्या काळात इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान विकसित नव्हतं. म्हणून स्ट्रॉजरने पूर्णपणे यांत्रिक यंत्रणा बनवली.
त्यात वापरकर्त्याला गोल फिरवायचा Rotary Dial होता. ज्या अंकावर डायल फिरवला जायचा, त्यानुसार कॉल थेट योग्य लाईनवर जोडला जात असे. एका रोटरवर 10 कनेक्शन, म्हणजेच 10 × 10 = 100 एक्स्टेंशन जोडता येत असत. हा फोनच आपण जुन्या चित्रपटांमध्ये पाहतो – ज्यात बोटाने गोल फिरवायचा डायल असतो.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

जगातलं पहिलं Automatic Telephone Exchange

1891 मध्ये स्ट्रॉजरला पेटंट मिळालं. 1892 मध्ये La Porte, Indiana येथे जगातलं पहिलं Automatic Telephone Exchange बसवण्यात आलं. त्याच्या जाहिरातीत त्याने एक भन्नाट ओळ लिहिली होती –
“Girl-less. Cuss-less. Out-of-order-less. Wait-less.”(मुलीशिवाय, शिवीशिवाय, बिघाडाशिवाय, प्रतीक्षेशिवाय) याचा अर्थ – कॉल आता थेट जोडला जाणार, कुठलाही मानवी हस्तक्षेप नाही.

Bell Systems व AT&T चा इतिहास

1916 मध्ये Bell Systems ने स्ट्रॉजरचे पेटंट विकत घेतले. पुढे हीच कंपनी Bell Telephone Company झाली आणि अखेर अमेरिकेतील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी AT&T म्हणून प्रसिद्ध झाली. आजही वॉशिंग्टन येथील SPARK Museum मध्ये स्ट्रॉजरने तयार केलेलं मूळ उपकरण जतन करून ठेवण्यात आलं आहे.

शिकण्यासारखं काय?

संकट आलं की अनेकदा आपण दोष देतो, रागावतो किंवा हार मानतो. पण स्ट्रॉजरने दाखवून दिलं की – “समस्येतच नवी संधी लपलेली असते. ती ओळखा आणि काहीतरी वेगळं तयार करा.” एक साधा Undertaker असूनही त्याने आपल्या शोधातून टेलिकॉम उद्योग कायमचा बदलून टाकला.


  • नम्र निवेदन
    “निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
    या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
QR 1


1889 मध्ये, अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) हा कॅन्सस …

Avatar photo

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.