हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
तत्कालीन व्यवस्थेवर अण्णाभाऊंनी आपल्या तळपत्या झुंजार लेखणीने प्रहार केला होता. आजही त्यांचे ते विचार आजच्या व्यवस्थेला, राजकारणाला लागू पडतो.अण्णाभाऊनी मराठी साहित्याला भरभरून कथा, कादंबऱ्या, नाटके, पोवाडा, प्रवासवर्णन दिले आहेत; पण इथल्या व्यवस्थेने त्यांना उपेक्षितच ठेवले. अण्णाभाऊ साठे एक लेखक, विचारवंत, समाजसेवक,शिवशाहीर साहित्यातील साहित्यसम्राट,साहित्य रत्न,साहित्यसूर्य होते. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णाभाऊ होते.
अण्णाभाऊ फकिरा कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहितात की, “मला कल्पनेचे पंख घेऊन भरारी मारता येत नाही, मी जे जीवन जगलो,पहिलं, अनुभवलो तेच मी लिहिलं. ” ही झुंजार लेखणी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. अण्णाभाऊंचे वास्तविक साहित्य म्हणजे आज कित्येक उच्च शिक्षित लोक पी.एच. डी .संशोधन करत आहेत. आपल्या झुंजार लेखणीने त्यांनी अजरामर कलाकृती मराठी साहित्याला दिलेली अनमोल भेट आहे. आज 105 वी जयंतीनिमित्त आज त्यांनी लिहिलेल्या फकिरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ,चंदन, आवडी, माझा रशियाचा प्रवास, साहित्य कलाकृतीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
अण्णाभाऊंच्या कथा, कादंबरीतील एका एका पात्रावर पी.एच. डी. करण्यासाठी दोन तीन वर्षे संशोधन करावे लागते.एका लेखात अण्णाभाऊ कळणे शक्य नाही. अण्णाभाऊ कार्य, साहित्य अफाट आहे .आज जागतिक पातळीवर त्यांच्या साहित्याची चर्चा होते. ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आजच्या दिवशी अण्णाभाऊंच्या झुंजार लेखणीस,साहित्यसूर्यास जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन ..!
अजय बनसोडे
मु.दापेगाव ता.औसा जि.लातूर
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...! -बंडूकुमार धवणे संपादक गौरव प्रकाशन
· * नम्र निवेदन * "भयमुक्त आणि चाटुगिरीविरहित पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे..." लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत. या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते. -बंडूकुमार धवणे संपादक गौरव प्रकाशन
