• Mon. May 29th, 2023

आजपासून रामदास आठवले राज्याच्या दौर्‍यावर

ByBlog

Dec 27, 2020

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले २७ डिसेंबरपासून राज्यव्यापी दौरा करणार असून पश्‍चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि ठाणे या विभागांची विभागनिहाय बैठक घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील कामगिरी आणि पक्ष सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत. या विभागीय बैठकांमध्ये पहिली बैठक रिपाइंच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची बैठक २७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पुण्यातील सदाशिव पेठेतील नवीपेठ येथील पत्रकार भवनच्या सभागृहात होणार असून त्यास रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी येत्या १0 जानेवारी पूर्वी पूर्ण करून येत्या २६ जानेवारीपयर्ंत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेऊन अहवाल निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. त्यासाठी लवकर शिस्तपूर्ण सदस्य नोंदणी गांभीयार्ने करावी. जो सदस्य नोंदणी करणार नाही त्याला रिपाइं मध्ये स्थान राहणार नाही, असा इशारा आठवले यांनी रिपाइंच्या मुंबई विभागीय बैठकीत नुकताच दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *