खासगी आस्थापनांनी कुशल, अकुशल मनुष्यबळाची नोंदणी करण्याचे आवाहन
नोंदणीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती : राज्यात कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. परंतू आता राज्यातील उद्योग व व्यवसाय पुर्ववत सुरु होत असुन रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. कौशल्य आधारित अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाव्दारे दि. 12 ते 13 डिसेंबर या कालावधीत “राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी त्यांना आवश्यक असलेल्या कुशल, अकुशल मनुष्यबळाची मागणी (पदे) ऑनलाईन पध्दतीने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदवावी. जेणेकरून आपल्याला आवश्यक कौशल्य व पात्रतेचे उमेदवार मिळू शकतील. ऑनलाईन मागणी नोंदवितांना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा.
त्याचप्रमाणे अमरावती जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक /युवतींना विभागाव्दारे आवाहन करण्यांत येते की, “राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्यात” महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील रिक्तपदे मोठयाप्रमाणात अधिसुचित झालेली असल्यामुळे त्यांनी सुध्दा www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने मेळाव्याकरीता सहभाग नोंदवावा.
एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., पदवीधर, डिप्लोमा व इतर पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्त पदांना अॅप्लाय करण्यासाठी, एम्पलॉयमेंन्ट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन अॅप्लाय करावे.
तसेच ज्या उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली नसेल अश्या उमेदवारांनी प्रथमत: नोंदणी करुन त्यानंतर प्राप्त होणा-या युजरआडी व पासवर्डच्या माध्यमातुन मेळाव्यातील रिक्तपदाकरीता आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अॅप्लाय करावे. अमरावती जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक / युवतींना सहभाग नोंदवितांना काही अडचण येत असल्यास कार्यालयाचा 0721-2566066 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा amravatirojgar@gmail.com या ई-मेलवर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.