Friday, November 14

सामना ब्रेन ट्युमरचा

23

ब्रेन म्हणजे मेंदू व ट्यूमर म्हणजे अनैसर्गिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ. मेंदूच्या पेशींच्या अनियंत्रित अनैसर्गिक अशा वाढीला ब्रेन ट्युमर असे म्हणतात. ही गाठ साधी अथवा कर्करोगाची असू शकते.
मेंदूत शरीरातील सर्व जाणवांचे संदेश येत असतात व त्यावर आदेशही दिले जातात.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

श्‍वसन, रक्ताभिसरण, शरीराचा तोल राखणे, हालचाली करणे अशा सर्वच महत्त्वाच्या क्रियांचे नियंत्रण मेंदूतील केंद्रामार्फतच होत असते. या बाबींमुळे मेंदूत येणारी गाठ वा ट्यूमर हा खूप गंभीर विकार समजला जातो. मेंदूचे काही ट्युमर हे शस्त्रक्रिया करून मुळापासून काढून टाकता येतात. त्यांचा कोणताही परिणाम नंतर दिसत नाही.

ब्रेन ट्यूमर मध्ये शरीरातील एखाद्या भागातील संवेदना नष्ट होणे, स्नायू शिथिल होणे, नष्क्रय होणे, झटके येणे, चक्कर येणे, डोके दुखणो अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या मेंदूची सिटीस्कॅन सारख्या उपकरणाने तपासणी करून घेणे आवश्यक असते. ब्रेन ट्यूमरचे निदान लवकर झाले तर तो काढणे बर्‍याचदा शक्य होते व त्यामुळे व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.

गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

निदान व्हावयास खूप उशीर झाला तर मात्र शस्त्रक्रिया अवघड होते व रुग्णांच्या जवाला धोका उद्भवतो. तसेच शस्त्रक्रियेनंतरही हात व पाय लुळे पडू शकतात.
ब्रेन ट्युमरच्या शस्त्रक्रिया सुदैवाने महाराष्ट्राच्या सर्वच प्रमुख शहरात आता होऊ लागल्या आहेत. हृदयाच्या शस्त्रक्रियेपेक्षा याचा खर्चही बराच कमी असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकही याचा फायदा घेऊ शकतात.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply