Thursday, November 13

वेळीच ओळखा फॅटी लीव्हरचा धोका..!

23

यकृत हा शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक.. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक बाजूला काढून विषारी द्रव्यं तसंच अन्य घटक बाहेर टाकण्याचं काम यकृत करत असतं. निरोगी यकृत ही कृती अव्याहतपणे करत असतं. मात्र यकृताभोवती चरबी साठू लागल्यास त्याच्या कामात अडथळे येऊ लागतात. यकृतात साठलेल्या अतिरिक्त चरबीमुळे उद्भवणार्?या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत हेपॅटिक स्टिटोसिस असं म्हटलं जातं. हेपॅटिक स्टिटोसिस म्हणजेच फॅटी लिव्हर. या फॅटी लिव्हरचे अनेक दुष्परिणाम आहेत. चरबी साठू लागल्यानंतर यकृताचा दाह, यकृताच्या कार्यात अडथळे आल्यामुळे विषारी घटक शरीरात साठून राहण्यासारख्या समस्या निर्माण होतात. या व्याधीने गंभीर स्वरुप धारण केल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता असते. म्हणूनच या आजाराची लक्षणं वेळीच ओळखून त्या दृष्टीने उपाययोजना करणं आवश्यक आहे.

या व्याधीचे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे दोन प्रकार आहेत. मद्याचं अतिसेवन करणार्?यांना अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. हा फॅटी लिव्हरचा सर्वसाधारण प्रकार आहे. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं प्रमाण तुलनेने कमी असून जगभरातल्या फॅटी लिव्हरच्या रुग्णांमध्ये १२ ते १५ टक्के लोकांना हा आजार होतो. सुरूवातीच्या टप्प्यात फॅटी लिव्हरची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. याच कारणामुळे या आजाराचं बराच काळ निदानच होऊ शकत नाही. असं असलं तरी शरीर देत असलेले काही संकेत फॅटी लिव्हरकडे इशारा करतात. या आजारात पोटाच्या वरच्या बाजूला उजवीकडे थोड्याफार वेदना जाणवतात. यासोबतच थकवा, आळस, वेदना, अस्वस्थता ही सुद्धा सर्वसाधारण लक्षणं आहेत.
यासह अचानक भूक मंदावणं, वजन कमी होणं, अशक्तपणा आणि आळस, त्वचेवर पिवळसर चट्टे उठणं, त्वचेखाली रक्ताच्या गुठळ्या होणं, पोटातल्या वेदना, सूज, डोळ्यांचा रंग बदलणं, अंग खाजणं, पायात सूज येणं, गोंधळ उडणं ही फॅटी लिव्हरची महत्त्वाची लक्षणं आहेत.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

अतिमद्यपान अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं प्रमुख कारण आहे. स्थूलपणा ही अत्यंत घातक अशी व्याधी आहे. स्थूलपणामुळे चयापचय क्रियेवर परिणाम झाल्याने तसंच फ्री रॅडिकल्समुळे दाह निर्माण झाल्यास यकृताच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो आणि त्याची परिणती फॅटी लिव्हरमध्ये होते. फॅटी लिव्हरचं निदान झालेल्यांची चयापचय क्रिया मंदावल्याने त्यांना वजन कमी करण्यात बर्‍याच अडचणी येतात. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिजला अनेक घटक कारणीभूत ठरत असले तरी मधुमेह आणि रक्तातल्या साखरेचं अनियंत्रित प्रमाण हे प्रमुख कारण मानता येईल. ट्रायग्लिसराइड्सचं अतिरिक्त प्रमाण, गरोदरपणा, हेपेटिटिस सी, विशिष्ट प्रकारच्या विषारी घटकांचं सेवन तसंच अनुवांशिक कारणांमुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply