आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी लवंग केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळवून देते. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. चला तर, याचे फायदे जाणून घेऊयात.
हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!
रात्री लवंगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.
कोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी १ ते २ लवंगा घेऊ शकतात.
दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यापासून मुक्त होण्यास मदत करते.लवंग खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
