Thursday, November 13

मेंदू आणि विस्मरण

28

एखाद्या व्यक्तीला अपघात झाला किंवा कोणी डोक्यात काठी हाणली तर त्याला मागचं काहीच आटवत नसल्याचे प्रसंग चित्रपट, मालिकांमधून आपण पाहतो. पण प्रत्यक्षात माणसाला इतक्या पटकन विस्मरण होत नाही. असह्य़ अशा शारीरिक किंवा भावनिक इजेवर मात करण्यासाठीचं शरीराचं ते एक संरक्षक साधन असल्याने हे घडण्यासाठी माणसावर तितकी महाभयंकर वेदना सहन करण्याची पाळी यावी लागते. मुळात कोणत्याही घटनेची, अनुभवाची, शिकवणीची आठवण साठवून ठेवण्याच्या कामात मेंदूची अनेक उपांग कार्यरत असतात. त्यात ‘हप्पोकॅम्पस’चा मोठा सहभाग असतो.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

या प्रक्रियेत काही बाधा आली तर त्या अल्पकालीन स्मृतीचं दीर्घकालीन स्मृतीत अवस्थांतर होऊ शकत नाही. साहजिकच ती पुसली जाते. अपघातात डोक्याला बाह्य इजा झाली असेल पण मेंदूला त्याची झळ पोहोचली नसेल तर स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच सारं व्यक्तिमत्त्वच ढवळून काढणारा भावनिक उद्रेक झाल्याशिवाय अशाप्रकारे अचानक विस्मरण होत नाही.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply