Wednesday, November 5

आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ व्हा

Aapatti

बदलत्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा विषय महत्त्वपूर्ण सिद्ध होत आहे. त्यामुळे पर्यावरणशास्त्राचा थोडासा प्रगत अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापनाचा प्राथमिक अभ्यास गरजेचा ठरत आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे जीवनामध्ये येणार्‍या अडचणींचं व्यवस्थापन. या अडचणी नैसर्गिक असोत की मानवनिर्मित, त्या सोडवण्याचं कौशल्य प्रत्येकाकडे असलंच पाहिजे. त्याशिवाय तो चांगल्या प्रकारे जगू शकणार नाही.

गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

यापूर्वी काही विद्यापीठांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होते. परंतु हा विषय असा न शिकवता सर्व पदव्यांच्या वर्गांना आवश्यक म्हणून शिकवावा असे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे हा अभ्यासक्रम व्यापक प्रमाणात उपलब्ध होणं शक्य झालं.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

तापमानवाढ तसंच हवामानातील बदल यामुळे पुढील काळात नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. तो लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अधिक संख्येनं कुशल मनुष्यबळाची भासणार आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात कारकिर्दीच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. हे लक्षात घेता या क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यायला हवा.

नैसर्गिक आपत्तीवेळी …

 

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply